गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंची ‘दे धडक’ भेट!

माओवाद्यांचा शहीद सप्ताह असतानाही नक्षलग्रस्त दुर्गम भागाला भेट ! मुंबई, 3 ऑगस्ट गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र  छत्तीसगढ़ सीमेवरील अतिदुर्गम पातागुडम या नक्षलप्रभावित गावाला भेट दिली. माओवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू असताना शिंदे यांनी ही भेट दिली हे विशेष. हे गाव गडचिरोलीपासुन तीनशे किमी दूर दुर्गम भागात आहे. या संवेदनशील परिसरातील गावांना भेट देत तेथील … Read more

कोकणात जाणा-या चाकरमान्यांचा जाच थांबवा!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय थांबवा. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे राज्यपालांना साकडे. कोकणच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट. मुंबई, दि.३ ऑगस्ट : गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्यातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जात आहे. परंतु सध्या त्यांची गैरसोय होत आहे. रायगडमधील खारपाडा, रत्नागिरीतील कशेडी आणि सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील तपासणी नाक्यांवर पासेसमुळे किंवा प्रशासकीय यंत्रणेत समन्वय नसल्यामुळे … Read more

भाजपा 5 ऑगस्टला दिवाळी साजरी करणार!

राममंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन. मुंबई, 3 ऑगस्ट 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ ५ ऑगस्ट रोजी होत असून आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र सामुहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान … Read more

नागपूरच्या खाजगी रुग्णालयांनो,खबरदार!

कोविड पेशंटला खाजगी रुग्णालयांनी भरमसाठ बिल आकारल्यास कारवाई. नागपूर, दि. ०३ ऑगस्ट,२०२० कोव्हिड-१९ च्या संदर्भात शहरातील खाजगी रुग्णालयांकरिता नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीच्या अंमलबजावणीकरिता भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी (आय.ए.एस.) तथा अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्या नेतृत्वात मनपातर्फे विशेष पथक गठीत करण्यात आले आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश निर्गमित केले आहे. … Read more

ऑक्सिजनयुक्त जादा बेड्सचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा.

पुणे दि. 3 ऑगस्ट पुणे शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन अति दक्षता विभागातील (ICU) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी औंध येथील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन खाटानिर्मितीच्या अनुषंगाने … Read more

राम मंदिर भूमिपूजनावेळी आनंदोत्सव करावा! 

सोलापूर, दि. 3 ऑगस्ट अनेक वर्षांपासून संपूर्ण भारत देश ज्याची वाट पहात होता तो क्षण जवळ आला आहे. बुधवार, 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या नगरीत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रामभक्तांनी सोशल डिस्टन्सचे पालन करून आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले आहे. … Read more

अमृता फडणवीस यांच्या ट्विटवरून उठले वादंग!

शिवसेनेने घेतला अमृता फडणवीस यांचा समाचार. सोशल मीडियावरही अमृता फडणवीसांविरोधात ट्रोल! मुंबई, दि. 3 ऑगस्ट अभिनेता सुशांत सिंहची आत्महत्या आता वेगळे वळण घेत असून तो आता राजकीय मुद्दा बनला आहे. सुशांत च्या आत्महत्येची चौकशी मुंबई पोलीस करत असताना बिहार पोलिसही चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले पण त्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याने वाद सूरू झाला आहे. त्यातच या … Read more

राम मंदिरासाठी नरेंद्र मोदींचे योगदान काय?

खरे श्रेय तर राजीव गांधी, नरसिंहराव व अशोक सिंघल यांचेच! भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा मोदींना घरचा आहेर! मुंबई,  दि. 3 ऑगस्ट अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सूरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होत आहे. नरेंद्र मोदींमुळेच राममंदिराचा मार्ग मोकळा झाला असून त्याचे सर्व श्रेय नरेंद्र मोदींना देण्यात काही … Read more

अजितदादांकडून रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा. रक्षाबंधनाच्या सणामुळे घराघरात आनंद, चैतन्य येईल; समाजात स्त्री-पुरुष समानतेची भावना अधिक दृढ होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. ३ ऑगस्ट. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊ-बहिणीचं अतूट नातं रक्षाबंधनाच्या धाग्यांनी अधिक घट्ट करणारा हा सण आपल्या सर्वांच्या … Read more

क्रांतिसिंह यांचे कार्य सदैव प्रेरणा देत राहील!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन.. मुंबई, दि. ३ ऑगस्ट संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतिनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून क्रांतिसिंहांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आणि देशाच्या जडणघडणीसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी केलेले कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा देत … Read more