CM बद्दल अर्नबने अनुद्गार काढूनही शिवसेना गप्प का?

मुख्यमंत्र्यांबद्दल अर्नब गोस्वामीने अनुद्गार काढूनही शिवसेना गप्प का ? राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी घेतला अर्नबचा समाचार ! मुंबई, दि. 2 ऑगस्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्नब गोस्वामीने ज्या पद्धतीने कार्यक्रमात ऐकेरी भाषा वापरून अपमान केला त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. या चॅनल व पत्रकाराविरोधात कारवाई का केली जात नाही असा सवाल विचारला जात आहे. … Read more

शिरूर व न्हावरे ग्रामीण रुग्णालयात कोवीड केंद्र सुरू करा!

शिरूर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा. कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील. पुणे दि. 2 ऑगस्ट कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना गती देण्यासोबतच तातडीने कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी तसेच ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोवीड आरोग्य केंद्र येत्या पाच दिवसात सुरू करावे, असे निर्देश कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले. कोरोनाबाधित … Read more

ST कर्मचाऱ्यांचे वेतन द्या; अन्यथा रस्त्यावर उतरू!

मुंबई, दि. २ ऑगस्ट गेले चार महिने आघाडी सरकारने जाणीवपूर्वक बंद ठेवलेल्या राज्यातील सार्वजनिक परिवहन सेवेच्या कर्मचा-यांना वेतन अदा केले जात नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याने कर्मचा-यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. त्याकडे सरकारचे अजिबात लक्ष नसून उलट कंत्राटी कर्मचारी काढण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. एसटी महामंडळ बंद करण्याचा घाट सत्ताधारी पक्षाने … Read more

उस्मानाबादेत लॉकडाऊन विरोधात ‘वंचित’चे आंदोलन!

  उस्मानाबाद, दि.२ ऑगस्ट येथील वंचित बहुजन आघाडीकडून सर्व तालुक्यात आंदोलन करण्यात आले. नळदुर्ग येथे जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे यांच्या उपस्थितीत व्यापारी, छोटे दुकानदार यांना लॉकडाऊनच्या विरूध्द सर्व व्यवहार चालू ठेवावेत असे आवाहन केले. त्याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. उस्मानाबाद येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गायकवाड, अंकुश लोखंडे, युवा नेते अंकोल वाघमारे ,वागदरी शाखेचे अध्यक्ष सुदर्शन … Read more

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत बीड नंबर-1!

बीड जिल्हा राज्यात अव्वल! तब्बल १७ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक बीड, दि. 2 ऑगस्ट प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत सर्वात उशीरा पीकविमा कंपनी मिळालेल्या बीड जिल्ह्यात ३१ जुलै अखेर तब्बल १७ लाख ७१ हजार पीकविमा अर्ज आले असून, ही संख्या राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त … Read more

MIDC कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी १० लाखांवरुन १४ लाख!

तळेगावमध्ये २५० एकरवर अद्ययावत इलेक्ट्रॉनिक पार्क. कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची मर्यादा १० लाखांवरुन १४ लाख. MIDC च्या वर्धापनदिनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा. मुंबई, दि. 2 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) 58 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एमआयडीसीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची (उपदान) मर्यादा दहा लाखांहून 14 लाख करण्यात आली. तसेच पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे 250 एकरावर स्वयंपूर्ण असे इलेक्ट्रॉनिक … Read more

राज्यपाल यांनी शिक्षकांना दिला ‘हा’ मंत्र!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित ‘मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण’ या ७ दिवसांच्या ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई, दि. 2 कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नैराश्याचे वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थी व युवक यांच्यापुढे आव्हानात्मक परिस्थिती उभी आहे. या परिस्थितीतून युवकांना बाहेर काढण्यासाठी व समाजाला जागरूक करण्यासाठी शिक्षकांना समुपदेशक म्हणून भूमिका पार पाडावी लागेल. देशाला प्रगतीच्या वाटेने … Read more

सोलापूर विद्यापीठ झाले 16 वर्षांचे !

अल्पकालावधीत सोलापूर विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण भरारी, वर्धापन दिन कार्यक्रमात पालकमंत्री भरणे यांचे गौरवोद्गार. सोलापूर, दि.1 ऑगस्ट.. केवळ एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अल्प कालावधीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देत गुणवत्तापूर्ण भरारी घेतली आहे. देशातील व विदेशातील नामांकित संस्था व विद्यापीठांशी सामंजस्य करार करून गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत … Read more

आता ‘8 अ’ चा उताराही झाला digital !

मुंबई, दि.1 ऑगस्ट महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागामार्फत आजपासून ‘डिजिटल 8 अ’ ऑनलाईन सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ‘डिजिटल 8 अ’ सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आज करण्यात आला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऑनलाईन शुभारंभ केल्यानंतर सर्वांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित महसूल विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. थोरात यावेळी म्हणाले की, शासकीय कामात महसूल … Read more

अण्णाभाऊ साठेंचे यथोचित स्मारक लवकरच मुंबईत!

मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर युरेशियन स्टडीज व रशियन विभागातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेची सांगता मुंबई, दि. 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून जनजागृती केली. त्यांच्या या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांची साहित्यसंपदा एका ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यादृष्टीने त्यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक सर्वांच्या सहकार्याने मुंबईत लवकरच … Read more