निवडणूक अधिका-याच्या मुद्द्यावर काँग्रेसचा पुन्हा हल्लाबोल!

नरेंद्र मोदींविरोधात आचारसंहिता भंगाचा अहवाल दिल्यानेच तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांची उचलबांगडी : सचिन सावंत बलदेव सिंह यांच्या विरोधातील चौकशी अद्याप अपूर्ण का? याचे उत्तर फडणविसांनी द्यावे मुंबई, दि. १ ऑगस्ट २०२० लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमधून सातत्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केला होता. त्यातही लातूर आणि वर्धा येथील प्रचाराच्या भाषणांमध्ये पुलवामा … Read more

टिळक व अण्णाभाऊंचे विचार आजही प्रेरणादायी!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन. मुंबई, दि. १ ऑगस्ट २०२० लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि लोकांमध्ये अन्यायाविरूद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा निर्माण केली. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. लोकमान्य टिळक यांच्या … Read more

दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा मंत्रालयावर धडक!

शिर्डी दि.१ ऑगस्ट महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व राज्यात कुठेही नाही, मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतक-यांना कोणतीही मदत नाही पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काॽ असा सवाल उपस्थित करतानाच सरकार पाडण्‍यात आम्‍हाला रस नाही, तुम्‍ही जनतेच्‍या मनातून केव्‍हाच पडले आहात, आता केवळ बैठकांचा फार्स करू नका दूध उत्पादकांच्या … Read more

आजपासून ITI साठी online admission सुरू!

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी 84 आयटीआयमध्ये 8348. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती. मुंबई, दि. १ ऑगस्ट.  अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याच्या अनुषंगाने यंदा राज्यातील 44 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) दुसऱ्या आणि तिसऱ्या पाळीतील वर्ग चालविले जाणार आहेत. याबरोबरच 40 खाजगी आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या चालविण्यात येणार आहेत. या माध्यमातून 84 आयटीआयमध्ये एकुण 8 हजार 348 … Read more

काय आहे ‘फॉस्टर केअर’ अर्थात प्रतिपालकत्व योजना?

प्रायोगिक स्वरूपात ५ जिल्ह्यात होणार अंमलबजावणी; ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध. मुंबई, दि. १ ऑगस्ट  एक मुलगी, आई अशा भूमिका मीदेखील बजावत आहे. त्यामुळे कुंटुंबाची, त्यांच्या प्रेमाची गरज याची जाणीव मला आहे. त्यामुळे अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देऊ शकणारी प्रतीपालकत्व योजना क्रांतिकारी ठरणार असून अनाथ बालकांना घर मिळवून देण्याच्या कामाइतके मोठे पुण्य नाही, अशी भावना … Read more

राज्यातील इतर शहरांमध्येही ‘झोपु’ योजना!

मुंबई, दि. 1 ऑगस्ट 2020 सर्वसामान्य गरीब माणसाचे घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई महानगर वगळता उर्वरित एमएमआर क्षेत्रासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण मुंबई महानगर वगळता मुंबई महानगर … Read more

दहावीत 500/500 मार्क मिळवलेल्या स्नेहल कांबळेच्या यशाची गोष्ट!

नांदेड  दि. 31 जुलै 2020 नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली शाळेची द्वारे पुन्हा त्याच उत्साहाने उघडल्या गेली. निकाल ऑनलाईन असल्यामुळे दरवर्षी निकालाच्या दिवशी शाळेत जशी गर्दी असते तशी दिसली नाही, मात्र विद्यार्थ्यांपासून शिक्षक, पालकांपर्यंत आत्मविश्वास पूर्ण आनंदात तसूभरही कमतरता झाली नाही. या आनंदाच्या उत्सवात स्नेहल कांबळे या विद्यार्थींनीने पाचशे पैकी पाचशे गुण … Read more

म. फुले जनआरोग्य योजनेत कोरोनावर उपचार करणारी हाॅस्पिटल्स!

जिल्ह्यात  43 दवाखान्यांत कोरोनावर उपचार… जिल्ह्यात आतापर्यंत 705 कोरोना रूग्णांनी घेतला लाभ. सोलापूर, दि.31: राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेला मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा प्रारंभ केला. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ही योजना सर्वांसाठी खुली असून सोलापूर जिल्ह्यात 43 दवाखान्यात या योजनेचा लाभ 705 रूग्णांना मिळाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. … Read more

विलगीकरण केंद्रातील महिलांना सुरक्षा द्या!

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची मागणी. मुंबई, 31 जुलै 2020 कोरोना संकटकाळात राज्यातल्या अनेक विलगीकरण केंद्रामध्ये महिला अत्याचाराचे प्रकार उघडकीस आले असूनही राज्य सरकारने मात्र महिला रूग्णांच्या सुरक्षेसाठी कोणतेही पाऊल उचलले नाहीये. महिला सुरक्षेसाठी नियमावली जाहीर करण्याचे केवळ पोकळ आश्वासन सरकारने दिले आहे. सरकारला महिलांच्या सुरक्षेचा विसर पडलेला आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीच्या … Read more

BMC कर्मचारी अजित दुखंडेंच्या मृत्युस जबाबदार कोण?

महापालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्याच्या मृत्यूची चौकशी अतिरिक्त आयुक्ताद्वारे करावी. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचे मनपा आयुक्तांना पत्र. मुंबई, दि.31 जुलै 2020 मुंबई महापालिका मुख्यालयात विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या अजित दुखंडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने बुधवारी निधन झाले. महापालिका मुख्यालयातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध पडले. मनपा मुख्यालयातील डॉक्टरने त्यांना तपासून तातडीने रुग्णालयात … Read more