राजभवनच्या अंगणात वारंवार जाण्यापेक्षा भाजपाने स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी!: बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाचा संकटाचा खंबीरपणे सामना करत असताना राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी आटापीटा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आज हसे झाले असून वारंवार राजभवनच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजपा नेत्यांनी आतातरी स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी, असा घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. भाजपाच्या आंदोलनाचा समाचार … Read more

कोरोनाच्या वाढत्या संकटात राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपाचे‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन.

राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी उद्या, मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत … Read more

असंघटीत क्षेत्रातील कामगारांना पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता द्यावा- पृथ्वीराज चव्हाण

कोरोना विरोधातील लढ्यात विधायक सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब थोरात आणि अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस श्री. मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. डॉ.भालचंद्र मुंगेकर हे या टास्क फोर्सचे समन्वयक म्हणून तर डॉ.अमोल देशमुख हे सचिव म्हणून काम पाहात … Read more