लग्नाचा बार उडवणारांसाठी महत्वाची बातमी.

लग्नासाठी येणाऱ्या ५० लोकांची जबाबदारी मंगल कार्यालय व आयोजकांची. सोलापूर, दि. ८ जून २०२० कोरोनाच्या काळात लग्न करणाऱ्यांसाठी आणखी काम व जबाबदारी वाढलेली आहे. लग्न सोहळ्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमामंध्ये आणखी अटी व शर्थी घालण्यात आल्या असून या अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी ही मंगल कार्यालय मालकासह ज्या कुटुंबातील लग्न आहे त्यांच्यावर असणार आहे. … Read more

पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांची आता खैर नाही

पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांची आता खैर नाही. नागपूर, दि. 2 जून २०२० शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेवर उपलब्ध करण्याच्या सूचना दिलेल्या असून शेतकऱ्यांवर कुठलेही कर्ज असले तरिही बँक त्यांना पीक कर्ज नाकारू शकत नाही. कोणत्याही बँकेने शेतकऱ्याला कर्ज देण्यास टाळाटाळ केली तर त्या बँकांवर  कडक कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी … Read more

लॉकडाऊनमध्येही भाजीविक्रीतून लाखोंची कमाल

लॉकडाऊनमध्येही भाजीविक्रीतून लाखोंची कमाल. कोल्हापूर, दि. ७ जून २०२० लॉकडाऊनमध्ये बहुतांशी उद्योग-व्यवसायांचे शटरडाऊन असताना, रेणुका स्वयं-सहाय्यता समुहाच्या दारावर मात्र भाजी पाल्याने ‘नॉक’ केले. गडहिंग्लज तालुक्यातील हिटणीमधील या समुहाने लॉकडाऊनच्या काळामध्ये भाजीपाला आणि फळे विक्री करून १ लाख २० हजाराची उलाढाल केली. गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असल्याने येथे मराठीबरोबरच कन्नड भाषासुध्दा बोलली जाते. … Read more

दाऊदचा मृत्यू झाला की तो जिंवत आहे; केंद्र सरकारने एकदाचे ठरवून सांगावे!: सचिन सावंत

दाऊदचा मृत्यू झाला की तो जिंवत आहे; केंद्र सरकारने एकदाचे ठरवून सांगावे!: सचिन सावंत. मुंबई, दि. ७ जून २०२०कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमातून येत आहेत. भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. दाऊदचा खरेच मृत्यू झाला की तो जिवंत आहे हे केंद्र … Read more

धारावीतील ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे विशेष रुग्णालय-राजेश टोपे

मुंबईतल्या घनदाट लोकवस्तीचा भाग असलेल्या धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्कजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत हे रुग्णालय उभे राहील्यामुळे याभागातील रुग्णांना आहे तेथेच उपचाराची सुविधा मिळणार आहे. उद्यापासून हे रुग्णालय कार्यान्वित होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाबाधीत रुग्णांना ऑक्सिजनचे … Read more

भाजपच्या खोटेपणावर कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार!: सचिन सावंतांचे भाजप नेत्यांना आव्हान

स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यातील सवलतीचा भाजपचा दावा खोटा ठरला असतानाही भाजपचे नेते ते मान्य करायला तयार नाहीत.सर्वोच्च न्यायालयात सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांनीच त्यांचा हा खोटारडेपणा उघड करुनही त्यांची वृत्ती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच दिसते. आपला खोटेपणा उघड पडला की वैयक्तिक पातळीवर घसरण्याची भाजपाची खोड जुनीच असून भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस यावे मी … Read more

राजभवनच्या अंगणात वारंवार जाण्यापेक्षा भाजपाने स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी!: बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाचा संकटाचा खंबीरपणे सामना करत असताना राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी आटापीटा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आज हसे झाले असून वारंवार राजभवनच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजपा नेत्यांनी आतातरी स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी, असा घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. भाजपाच्या आंदोलनाचा समाचार … Read more

कोरोनाच्या वाढत्या संकटात राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपाचे‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन.

राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी उद्या, मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत … Read more

असंघटीत क्षेत्रातील कामगारांना पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता द्यावा- पृथ्वीराज चव्हाण

कोरोना विरोधातील लढ्यात विधायक सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब थोरात आणि अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस श्री. मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. डॉ.भालचंद्र मुंगेकर हे या टास्क फोर्सचे समन्वयक म्हणून तर डॉ.अमोल देशमुख हे सचिव म्हणून काम पाहात … Read more