राज्यातील उद्योगांना दिलासा देणारा निर्णय काय आहे ?

राज्यातील उद्योगांना दिलासा देणारा निर्णय काय आहे ? विविध शुल्क आकारणीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. मुंबई, दि. १७ जून २०२० कोरोनाच्या संकटामुळे अडचणीँत सापडलेल्या राज्यातील उद्योगांना सरकारने दिलासा दिला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाद्वारे (MIDC) आकारण्यात येत असलेल्या विविध शुल्क आकारणीस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे … Read more

सहकारी संस्थांची रणधुमाळी पुन्हा लांबणीवर.

सहकारी संस्थांची रणधुमाळी पुन्हा लांबणीवर. सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलल्या !: बाळासाहेब पाटील. मुंबई, दि. १७ जून २०२०२ राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. पाटील म्हणाले की, कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता … Read more

उपसरपंचांसाठी गोड बातमी; आता त्यांनाही मिळणार मानधन…

राज्यातील ग्रामपंचायत उपसरपंचांनाही आता मानधन!: हसन मुश्रीफ उपसरपंचांना दरमहा १०००/१५०० व २००० असे लोकसंख्येनुसार मानधन. मुंबई, दि. १७ जून २०२० : राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात १५.७२ कोटी … Read more

अखेर मोदींनी मौन सोडले; चीनला दिला ‘हा’ इशारा.

अखेर मोदींनी मौन सोडले; चीनला दिला ‘हा’ इशारा. चीनला चोख उत्तर देण्याचा पंतप्रधान मोदींचा इशारा. १९ जूनला विरोधी पक्षांबरोबर बैठक, २१ ला देशाला संबोधीत करणार. मुंबई, दि. १७ जून २०२० चीनने भारतीय भूभागावर घुसखोरी करुन २० भारतीय जवानांना ठार केल्यानंतर देशभरात मोदी सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.विरोधी पक्षांनीही मोदी सरकारला धारेवर धरले आहे. … Read more

अखेर सत्य पुढे आलेच, असे फडणवीस कशाबद्दल म्हणाले ?

  कोरोना मृत्यूंची संख्या कमी दाखवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा!: देवेंद्र फडणवीस अखेर सत्य पुढे आलेच…! मुंबई, दि. १६ जून २०२० महाराष्ट्र सरकार कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या द़वत असल्याचा आपला संशय खरा ठरला असून अखेर सत्य बाहेर आहे. सरकारनेच मुंबईतील ८६२ आणि इतर जिल्ह्यांतील ४६६ कोरोना मृत्यू आज जाहीर केल्यामुळे राज्यातील एकूण कोरोना मृत्यांच्या संख्येत १३२८ … Read more

कोकणवासियांना थेट मदतीचा भाजपाचा निर्धार.

कोकणवासियांना थेट मदतीचा भाजपाचा निर्धार. मुंबई, १५ जून २०२० निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील बांधवांना थेट मदत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने निर्धार केला असून या कामात नागरिकांनी पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. चंद्रकांतदादा पाटील यांनी नागरिकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजपाने तातडीची मदत म्हणून कोकणवासियांसाठी काही गाड्या भरून … Read more

कोविडच्या संकटात महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी.

महाराष्ट्रातील जनतेच्या संयमामुळे हे शक्य झाले.. वेल डन महाराष्ट्र ! जयंत पाटील मुंबई दि. १६ जून २०२० महाराष्ट्रात कोविड १९ च्या रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी असताना दोन तीन दिवसापासून दिलासादायक चित्र दिसत असून कोविड १९ चे रुग्ण बरे होऊन घऱी परतण्याची संख्या वाढत आहे. राज्यात सोमवारी एकाच दिवशी ५ हजार ७१ कोविड रुग्णांना डिस्चार्ज … Read more

शाळेचा श्रीगणेशा डिजीटल पद्धतीने!

शाळेचा श्रीगणेशा डिजीटल पद्धतीने! कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागातील शाळा प्रत्यक्ष सुरु होणार. मुंबई दि १५ जून २०२० (XXL News Team) शाळा सुरु होणार का, झाल्या तर कशा पद्धतीने, लहान मुलांना शाळेत कसे पाठवायचे अशा अनेक प्रश्नांनी पालकांची झोप उडलेली असतानाच राज्य शासनाने शाळेचा श्रीगणेशा करण्यास करण्यास परवानगी दिलेली  आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसेच … Read more

गुंतवणुकदारांचा महाराष्ट्रावरच विश्वास, १६ हजार कोटींची गुंतवणूक.

कोरोना संकटातही उद्योगपतींचा महाराष्ट्रावरच विश्वास. १६ हजार कोटींची गुंतवणूक, ९० हजार रोजगार. मुंबई, दि.१५ जून २०२० (XXL News Team) कोरोनाच्या संकटामुळे उद्योगधंद्यात आलेली मरगळ आता झटकली जात असून महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्योगपतींच्या, गुंतवणूकदारांच्या विश्वासास पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० मधून १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या गुंतवणुकीतून राज्यात जवळपास … Read more

कोरोनाच्या संकटात कसा पार पडला तुकोबारायांचा पालखी सोहळा?

कोरोनाच्या संकटात कसा पार पडला तुकोबारायांचा पालखी सोहळा. देहूगाव दि. १२ जून २०२० पंढररपूरची आषाढी वारी ही तमाम वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते. दरवर्षी या वारीसाठी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. आषाढी वारी यातील सर्वात मोठी वारी. या वारीसाठी देहूनगरीतून संत तुकाराम महाराज यांची पालखी निघते त्यानंतर आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. … Read more