…आता तरी पेट्रोलचे दर कमी करा.
मुंबई, दि २० जून २६ :-
मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचा दर सुमारे ३० डॉलर प्रति बॅरलने कमी झाला आहे. केंद्र सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन पेट्रोल-डिझेलच्या दरात तातडीने कपात करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी केली.
जयंतराव पाटील यांनी याबाबत सोशल मीडिया हँडलवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणतात की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचा दर सुमारे ३० डॉलर प्रति बॅरलने कमी झाला आहे. मात्र, त्याचा लाभ देशातील सर्वसामान्य नागरिकांना मिळालेला दिसत नाही.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अद्यापही जास्त आहेत व याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होत असून त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शेतकरी, कामगार, व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय नागरिक यांना वाढत्या खर्चाचा मोठा फटका बसत आहे.
केंद्र सरकारने जनतेच्या भावना लक्षात घेऊन पेट्रोल-डिझेलच्या दरात तातडीने कपात करावी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
Leave a Comment