पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत होणार!

मुंबई दि. ४ ऑगस्ट कोरोना’चे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने पुणे – नाशिक हा रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करु असा विश्वास व्यक्त करतानाच या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या … Read more

संस्कृत ही जनसामान्यांची भाषा व्हावी!

भाषेच्या पुन:जागरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : राज्यपाल रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे आयोजित ऑनलाईन संस्कृत महोत्सवाचे उद्घाटन. नागपूर, दि. 4 संस्कृत भाषा ही जगातील सर्व भाषांची जननी आहे. सर्व विषयांच्या ज्ञानाचे उगमस्थान असलेल्या या जगतजननीच्या पुन:जागरणासाठी  सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल तथा कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले. रामटेक … Read more

अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर दिला!

मुंबई, दि. ४ – जगात भारतीयांकडे संशयीत नजरेने पाहिले जाते मात्र याबाबत कोणीही भारतीय स्वतःला विचारत नाही की आमच्यावर अत्याचार झालेले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करीत आहे. मात्र हे सत्य आहे कि वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत आहेत हे आता आयोध्येत होत आहे. हे सत्य आजही भारतीय मानायला तयार नाही. … Read more

मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत,मुंबई ठाण्यात रेड अलर्ट!

मुंबई, दि. 4 ऑगस्ट मुंबईत सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकल व रस्ते वाहतूकही कोलमडली असून पुढील 48 तासात मुंबई व परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. आज मंगळवारी दुपारी १२.४७ … Read more

महसूल विभाग शासन व प्रशासनाचा कणा!

नाशिक येथे आगळावेगळा ऑनलाईन महसूलदिन साजरा; महसूलमंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री, कृषिमंत्री यांची कौतुकाची थाप नाशिक दि. 4 ऑगस्ट, 2020  महसूल विभाग हा शासन व प्रशासनाचा कणा आहे. या महसूल वर्षात ‘आठ अ’ हा ऑनलाईन उतारा देण्याची सुविधादेखील सुरू करण्यात आली असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ऑनलाईन महसूल दिन कार्यक्रमात राज्याचे महसूल … Read more

आरोग्याच्या पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य!

साथींच्या आजारांवर मात करण्यासाठी राज्यभरात कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारणार. ठाणे, दि. 4  विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. भविष्यात साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात समर्पित कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारण्याची नितांत आवश्यकता असुन त्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविडशी लढताना राज्यातील पालिकांना निधी कमी पडू … Read more

लालबागचा राजाच्या आरोग्योत्सवाचे उदघाटन!

मुंबई दि.4 ऑगस्ट देशावर आलेल्या कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा श्रींची प्रतिष्ठापना न करता लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधत आरोग्योत्सव व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन केले.या अतिशय स्तुत्य उपक्रमाचे उदघाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. तसेच महाराष्ट्रातील ९२ शहीद पोलिस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश … Read more

लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांनी बदलले शाळेचे रूप !

लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांनी बदलले शाळेचे रूप ! चंद्रपूर, दि. 3 ऑगस्ट: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लादलेल्या लॉकडाऊन मध्ये आता काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असून अनलॉकची प्रक्रियाही सुरू आहे. लॉकडाऊन आणि अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये शाळांना सुटी देण्यात आली आहे. शिक्षक मात्र आवश्यक ती खबरदारी घेऊन ई लर्निंग कँटेन्ट, उत्तरपत्रिकांची तपासणी, निकालपत्र संबंधित कामकाजाकरिता शाळेत उपस्थित राहत आहेत. … Read more

गृहमंत्र्यांचे महिला पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन!

गृहमंत्र्यांच्या रुपाने मिळाला महिला पोलिसांना हक्काचा भाऊ. मुंबई, दि.३ ऑगस्ट  सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आपले घरदार, नातेसंबंध बाजूला ठेवून लोकांच्या रक्षणार्थ झटणाऱ्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने त्यांच्या हक्काचा मोठा बंधू गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रुपाने मिळाला. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने गृहमंत्र्यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरे … Read more

‘टेस्ट-ट्रेसिंग-ट्रीटमेंट’ या त्रिसूत्रीवर काम करा!

नागपूर येथे कोविड-१९ आढावा बैठकीत महसूलमंत्र्यांचे निर्देश नागपूर, दि. 3 : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले साडेचार महिने शासनाची  सर्व यंत्रणा काम करत आहे. दैनंदिन व्यवहार व अर्थव्यवस्था सुरळीत करण्यालासुद्धा प्राधान्य देणे आवश्यक आहे. अशा कठीण परिस्थितीत नागरिकांनी काळजीसह स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. कोरोना ग्रामीण भागात वाढीस लागला असून कोविड-19 वर मात करण्यासाठी टेस्ट, ट्रेसिंग व … Read more