Ads

-

मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत,मुंबई ठाण्यात रेड अलर्ट!

By Xtralarge News

August 4, 2020 12:25 pm

Ads

मुंबई, दि. 4 ऑगस्ट

मुंबईत सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार
पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
लोकल व रस्ते वाहतूकही कोलमडली असून पुढील 48 तासात मुंबई व परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

आज मंगळवारी दुपारी १२.४७ मिनिटांनी ४.४५ मीटर उंचीची भरती आहे. याचा विचार करून मुंबईकरांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे,असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने  केले आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबईकरांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये तसेच समुद्रकिनारे, पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, गोयल देऊळ, भेंडी बाजार जंक्शन, ठाकुरद्वार नाका, षण्मुखानंद हॉल, शेख मिस्त्री दरगाह मार्ग, पोस्टल कॉलोनी येथे पाणी साचले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मालाड येथे दरड कोसळली आहे. या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न सूरू आहे. मंगळवार व बुधवार या दोन दिवसात मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्य़ात काही ठिकाणी अतिवृष्टी तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

#MyBMCUpdates
#MyBMCMonsoonUpdates

No comments to show.

Leave a Comment