मोदीजी इव्हेंट करा, पण ‘प्यारे देशवासीय’ वाचविण्याची मुव्हमेंट राबवा!

वरिष्ठ पत्रकार रफ़ीक मुल्ला यांचा विशेष लेख. मुंबई, दि. 10 ऑगस्ट आपल्या देशात कोरोनाने प्रत्यक्ष बाधित झालेल्यांचा आकडा २० लाखावर गेलाय. जेव्हा १५ लाख होता, तेव्हा मोदींकडे असलेल्या ‘त्या’ उधार १५ लाखाची आठवण अनेकांना झाली. विनोदाचा भाग सोडला तर भीतीचा भाग उरतो आणि धडकी भरते. केरळमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला असे ३० जानेवारी २०२० रोजी … Read more

खा. श्रीकांत शिंदेंकडून साता-याला 2 रुग्णवाहिका!

मंत्री आदित्य ठाकरे वाढदिवसानिमित्त रुग्णवाहिका भेट.. ठाणे, दि. 10 ऑगस्ट शिवसेना नेते तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ३० व्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने राज्यात ३० रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यातील २ सुसज्ज रुग्णवाहिका सातारा जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेकरिता प्रदान करण्यात आल्या. या दोन्ही रुग्णवाहिका सातारा … Read more

….उलट भाजपचेच आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर!

राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही निव्वळ अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला आतुर – नवाब मलिक. मुंबई दि.१० ऑगस्ट राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात जाणार अशी अफवा विरोधक पसरवत असून ही खोटी व निव्वळ अफवा आहे. विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी … Read more

लाॅकडाऊनमध्ये महाराष्ट्रात ‘असे’ सुरू आहे शिक्षण!

आपत्कालीन परिस्थितीतही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरुच! शालेय शिक्षण विभागातर्फे दिले जाते ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षण मुंबई, दि. 10 ऑगस्ट कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी संचारबंदीच्या कालावधीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्येही विविध माध्यमांद्वारे शिक्षण … Read more

‘वंचित’चे ‘डफली बजाव’आंदोलन 12 ला!

पुणे, दि. ९ ऑगस्ट केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष … Read more

रानभाज्या खा आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवा!

मुंबई, दि.9 ऑगस्ट कोरोनाचे संकट आल्यापासून एक शब्द मात्र परवलीचा झालाय तो म्हणजे इम्युनिस्टी बुस्टर अर्थात रोगप्रतिकारक शक्ती..यासाठी लोकांनी तर तुफान खरेदी केली. च्यवनप्राश, तुलसी, वेगवेगळे काढे, आयुर्वेदिक,  होमिओपॅथी, अॅलोपॅथी सगळ्यांनी आपले प्राॅडक्ट मोठ्या जाहिराती करत बाजारात माःडलं. लोकांनी विशेषतः शहरात तर यांचा तुफान खप…पण यात एक महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपल्याकडे असलेल्या रानभाज्या..या रानभाज्या … Read more

सातारा-कोल्हापूर जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण वाढवा.

एक-दोन दिवसात क्रांती सिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी होणार सुरु. सातारा दि. 9 ऑगस्ट सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आता मोठ्या प्रमाणात आढळत आहे. या दोन्ही जिल्ह्यात कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढविले पाहिजे. तसेच प्रत्येक कोरोना रुग्णामागे कमीत कमी 15 निकट सहवासितांची टेस्ट केली पाहिजे. यामुळे कोरोना संसर्ग आटोक्यात येईल. तसेच या जिल्ह्यातील … Read more

जागतिक आदिवासी दिनानिमित्त योजनांची खैरात!

आदिवासींच्या हितासाठी आदिवासी हित संरक्षण कक्षाची व आरोग्यासाठी आदिवासी आरोग्य संवर्धन कक्षाची स्थापना करण्यात येणार नाशिक, दि. 9 ऑगस्ट दरवर्षी जागतिक आदिवासी गौरव दिन आपण मोठ्या जल्लोषात खुल्या मैदानात साजरा करत असतो. परंतु कोरोनाचा वाढत प्रादूर्भाव लक्षात घेता आपण हा दिवस ऑनलाईन पध्दतीने साजरा करतोय. आदिवासी गौरव दिन साजरा करत असतांना आदिवासी जमातीच्या वैचारिक जडण-घडणीसाठी … Read more

…१९४२ च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळ!

ऑगस्ट क्रांती दिनी काँग्रेस नेत्यांचे हुतात्म्यांना अभिवादन. मुंबई, दि. ९ ऑगस्ट २०२० आपल्या पूर्वजांनी प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. काँग्रेस पक्षाने या देशात लोकशाही रूजवली मात्र केंद्रातील भाजप सरकार संविधानाला पायदळी तुडवून देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी १९४२ च्या लढ्याप्रमाणे पुन्हा लढा देण्याची वेळ आली आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी … Read more

ग्रामीण भागातही स्टार्टअप्स विकसित व्हावीत!

  मुंबई, दि. ९  ऑगस्ट नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली असून त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा ही संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. अशी स्टार्टअप्स ग्रामीण भागातही विकसित व्हावीत यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येतील. ग्रामीण भागातील तरुणांनीही त्यांच्या विविध कल्पना योग्य व्यासपीठावर घेऊन जाणे … Read more