महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न !

स्टार्टअप्सना मिळणार १५ लाख रुपयांपर्यंतचे शासकीय कामाचे आदेश. नवकल्पनांना चालना देण्याबरोबरच शासकीय यंत्रणेत नाविन्यता आणण्याचा उद्देश. मुंबई, दि. ९ : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नुकताच महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सपैकी उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड करण्यात आली असून त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा ही संबंधित शासकीय विभागांमध्ये प्रायोगिक … Read more

जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा…

मुंबई, दि. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या शौर्याचे, कार्याचे, त्यागाचे स्मरण करुन राज्यातील जनतेला आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डोंगर-दऱ्या, रानावनात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी निसर्गसंपदेचं संरक्षण, संवर्धन तर केलंच, बरोबरीनं प्रथा-परंपरा, लोककला, लोकसंस्कृतीच्या माध्यमातून देशाचं सांस्कृतिक वैभव समृद्ध केलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवांचा गौरव केला … Read more

परदेशात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार!

परदेश शिष्यवृत्ती : ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या मागील व चालू वर्षीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार शैक्षणिक फी व निर्वाहभत्ता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती मुंबई, दि. 9 ऑगस्ट सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कोरोनामुळे परदेशातून किंवा भारतातून ऑनलाईन शिक्षण घेत असतील तर त्यांनाही फेब्रुवारी २०२० ते सप्टेंबर २०२० … Read more

कोल्हापूर सांगली भागात पूरस्थिती टाळण्यासाठी खबरदारी!

महापुराची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये समन्वय. पूरस्थितीचा राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडून आढावा. इचलकरंजी, दि. 9 ऑगस्ट गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर सांगली भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व बेळगाव … Read more

आदर्श घ्यावा असे नांदेडच्या मुखडचे कोविड केंद्र!

जेंव्हा कोविड केअर सेंटरमध्ये “माणसाने माणसाशी माणसासम वागावे…” प्रार्थना निनादते! नांदेड, दि. 8 नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या काठावर असलेला मुखेड तालुक्यातील शंभर बेडचे कोविड केअर सेंटर. रोज नित्य-नियमाप्रमाणे सकाळी इथे उपचार घेणारे बाधित उठतात. सकाळच्या प्रातक्रिया आटोपून ही मंडळी एका वेगळ्या गोष्टीसाठी अतुरतेने वाट पाहत असतात. मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. आनंद पाटील यांच्या … Read more

…… तेव्हा हे विनायक मेटे गप्प का होते?

विनायक मेटेंचे आरोप म्हणजे मराठा आरक्षणविरोधातील कटाचा भाग? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा हल्लाबोल. मुंबई, दि. ८ ऑगस्ट २०२०: मराठा आरक्षणाच्या छुप्या विरोधकांनी कट-कारस्थाने सुरू केल्याचा संशय असून, विनायक मेटेंनी राज्य सरकारविरूद्ध सुरू केलेले धादांत खोट्या आरोपांचे सत्र हा त्याच कटाचा भाग असू शकतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले … Read more

…मग अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी का नको?

मुंबई, दि.8 ऑगस्ट सुशांतसिंगच्या आत्महत्येची CBI चौकशी करण्यासाठी सर्व स्तरातून वातावरण निर्मिती करण्यात आली आणि अखेर या प्रकरणाची CBI चौकशी करेल असा निर्णय वरच्या पातळीवर झाला आहे.  सुशांतसिंगच्या आत्महत्येचा राजकीय मुद्दा करून आपले राजकीय हित साधण्यात कोणत्या पक्षाचा पुढाकार राहिला हे सर्वांना माहित आहेच. सुशांत आत्महत्याच्या आडून राजकीय हिशोब चुकता करण्याचे फासे टाकले असतानाच आता … Read more

अमृताबाई, पोलिसांविषयी जरा सबुरीने घ्या!

एका निवृत्त पोलीस अधिका-याचे अमृता फडणवीस यांना पत्र. मुंबई, दि  8 ऑगस्ट अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या हा राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला असून दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्याच्याच आत्महत्येची चर्चा आहे. ही आत्महत्या नसून हत्या आहे आणि याला राजकीय कनेक्शन आहे इथंपासून मुंबई पोलिसांच्या तपासावरही काहींनी आक्षेप घेतला. असा आक्षेप घेणारांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी … Read more

सोलापूरात ५०० बेडच्या कोविड हॉस्पीटलचा विचार!

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आक्रमक रणनितीनुसार कार्य कराः सोलापूरमध्ये ५०० बेडचे कोविड हॉस्पीटल उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. १०० दिवसाचे नियोजन करून अर्थव्यवस्थेला गती द्या. सोलापूर दि. ८ ऑगस्ट २०२० कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट याशिवाय सध्यातरी दुसरा पर्याय नाही. लोकांमध्ये कोरोनाबाबत जागरूकता निर्माण करून आक्रमक रणनिती तयार करून कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांचा शोध घ्या … Read more

एका अभिनेत्याच्या(सुशांत)मृत्यूचा राजकीय डाव…

बिहार निवडणूकीसाठी सुशांत आत्महत्या मुद्दा ! मातोश्रीला वेसण घालण्यासाठी खटपट ! वरिष्ठ पत्रकार रफ़ीक मुल्ला यांचा लेख … मुंबई, दि. 8 ऑगस्ट कुठे शेतकरी कुटुंबाला मारताना, कुठे दंगलीत दंगेखोरांचे पाठीराखे, कुठे आंदोलकांवर हल्ला करणारे, विद्यार्थ्यांना मारहाण करणारे..अशा अनेक घटनांमध्ये दिल्ली-गुजरात आणि उत्तर भारतातील पोलिस आपण पाहतो..तुलनेत मुंबई-महाराष्ट्राचे पोलिस सभ्य-कर्तव्यदक्ष..! अशा अन्यायकारक घटनांमध्ये त्यांचा थेट-उघड सहभाग … Read more