बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार ₹!

दुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होणार. मुंबई दि. १३ ऑगस्ट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या  खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा … Read more

20 सप्टेंबरची परीक्षा सर्व विभागीय केंद्रांवर!

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेची अंमलबजावणी. मुंबई दि. 13 ऑगस्ट महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाईल. विधानसभा अध्यक्ष, नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष  सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्यावतीने चर्चा केली … Read more

वंचितांच्या सेवेसाठी सदैव तत्पर!

मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विकास विभाग, मदत व पुनर्वसन. मुंबई, दि. 13 ऑगस्ट गेल्या काही दिवसांपासून आपणा सर्वांना कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक अडचणी ना तोंड द्यावे लागत आहे. वंचित, बहुजन समाज, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, बाराबलुतेदार, ओबीसी विविध लहान मोठ्या समाज घटकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विभागामार्फत सतत प्रयत्न सुरू आहे. बहुजनांचे कल्याण करण्यासाठी महाविकास आघाडी … Read more

राज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा.

काजू व्यावसायिकांना स्टेट जीएसटीची शंभर टक्के प्रतिपूर्ती.. मागील कालावधीतील व्हॅटची थकीत रक्कमही परत मिळणार. मुंबई, दि. १३ ऑगस्ट काजू व्यावसायिकांना या चालू आर्थिक वर्षापासून राज्य वस्तु आणि सेवा कराच्या (स्टेट जीएसटी) रकमेची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. त्याचबरोबर काजू व्यावसायिकांची मागील कालावधीतील व्हॅट परताव्याची थकीत … Read more

ST च्या ‘स्मार्ट कार्ड’ला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ!

मंत्री,अॅड.अनिल परब यांची माहिती. मुंबई: दि.१३ ऑगस्ट करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याच्या परिस्थिती लक्षात घेऊन सदर योजनेला ३० नोव्हेंबर,२०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे. महाराष्ट्रशासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून … Read more

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना टोलमाफ!

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. मुंबई, दि. १३: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून मिळणार सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. यासंदर्भात मंत्री शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई … Read more

बदल्यांमधून मंत्र्यांची प्रचंड कमाई…. !

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी.. मुंबई, १३ ऑगस्ट २०२० राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे. याची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त खात्याने बदल्या करू नयेत … Read more

बालकवींच्या कवितांमधला निसर्ग…

काही वाचलेले… काही भावलेले..आनंदयात्री बालकवी.. वरिष्ठ पत्रकार आणि कवी दुर्गेश सोनार यांचा विशेष लेख. मुंबई, दि. 13 ऑगस्ट. अगदी लहानपणापासून जसं वाचनाचं वेड लागलं, तसं बालकवींच्या कवितांचं गारुड मनावर भिनत गेलं. अत्यंत तोकडं आयुष्य जगलेल्या बालकवींच्या कवितांमधली तरलता, गेयता आणि नादमाधुर्य मनात खोलवर रुजलं गेलं. ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे…’ असं म्हणत आनंदाचं गाणं … Read more

खावटी अनुदान योजना पुन्हा सुरु!

विवंचनेतील आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना पुन्हा सुरु. सुमारे ११.५५ लाख आदिवासी लाभार्थींना फायदा आर्थिक विवंचनेतील आदिवासींना आधार देणारी खावटी योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 2013-14 पासून ही योजना बंद होती. आता या योजनेत 100 टक्के अनुदान देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले. यानुसार ही योजना एक वर्षासाठी … Read more

रेशनवर मिळणार मोफत 1 किलो चणाडाळ!

अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना मोफत एक किलो चणाडाळ. मुंबई, दि. 13 ऑगस्ट प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर 2020 या कालावधीकरिता अख्या चण्याऐवजी प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. … Read more