कोरोना संकटातही व्यावसायिक विकासाची ‘उमेद’!

.ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे महिला बचतगटांना आवाहन. ऑनलाइन  मेळाव्यात राज्यभरातून सुमारे एक लाख महिला सहभागी. मुंबई, दि. १६ : महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून तयार केलेले साहित्य व उत्पादनास ॲमेझॉनद्वारे जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे काम ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना काळात ऑनलाईन खरेदीस चालना मिळाली आहे. त्या अनुषंगाने कोरोना संकटामुळे निर्माण झालेली स्थिती ही अर्थार्जनाच्या … Read more

काय आहे चिमूरचा क्रांती लढा?

चंद्रपूर, दि. 16 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये चिमूर हा क्रांती लढा एक सोनेरी पान म्हणून कायम स्मरणात आहे. चिमूरच्या लढ्याने भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची ‘ करो या मरो ‘ ही भूमिका आणि दीशा राष्ट्रीय स्तरावर निश्चित केली, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले. … Read more

खाजगी लुटारु हाॅस्पिटलला भाजपने शिकवला धडा!

कुर्ला येथील कोहिनूर रुग्णालयात सामान्य रुग्णाला. लाखाचे बिल आकारल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश. मुंबई दि. १६- कोरोना रुग्णांची खाजगी हाॅस्पिटलमध्ये प्रचंड लूट सुरू असून बिल पाहूनच डोळे पांढरे होतात. लाखो रुपयांची बिलं देऊन  सर्रास लूट होत आहे. कुर्ला येथील एका सामान्य रुग्णाला  17  लाख रुपयांचे बिल कोहिनूर हाॅस्पिटलने आकारले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या रुग्णालयाला भेट दिली … Read more

‘या’ तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण!

मुंबई, दि. १६ ऑगस्ट राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील १४ जिल्ह्यामधून इच्छूक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यामध्येही ती लवकरच सुरु केली जाईल. सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरु असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या यासंदर्भातील नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणानंतर सुरु करण्यात … Read more

‘त्या’ भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो!

मुंबई. दि. १६ ऑगस्ट २०२० केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना यावर्षी एकही पदक मिळालेली नाही त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना तब्बल ५८ पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान गाणाऱ्या व महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक राज्यातील भाजपा नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही श्रीरामचरणी प्रार्थना, अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश … Read more

आबा! स्वच्छ प्रतिमा व धडाडीचा नेता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली… मुंबई, दि. 16 :- माजी उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय आर. आर. आबांना आपल्यातून जावून पाच वर्षे झाली असली तरी त्यांच्या आठवणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या मनात आजही ताज्या आहेत. स्वर्गीय आबांनी राबवलेलं ग्रामस्वच्छता, तंटामुक्ती अभियान, त्यांचा डान्सबारबंदीचा निर्णय, पोलिसभरती भ्रष्टाचारमुक्त करुन हजारो युवकांना दिलेली संधी, यामुळे राज्यातील जनतेच्या मनातलं त्यांचं … Read more

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार!

स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहन.  मुंबई, दि. १५ ऑगस्ट  शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जे विकेल तेच पिकेल अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार अन्नधान्य मिळेल. शेतकऱ्यांच्या समोर सतत कर्जाचा डोंगर उभा आहे. शेतकऱ्यांना या समस्येतून कायमस्वरूपी कसे मुक्त करता येईल याकडे … Read more

साखर कारखाने सुरु करण्याचे नियोजन करा.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना.. सोलापूर, दि. 15: सोलापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या. जिल्ह्यातील शेती, पाऊस, खते आणि पीक कर्ज वाटप याबाबतचा आढावा भरणे यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाला या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद … Read more

दूध प्रश्नावर ‘जाणते राजे’बोलत का नाहीतॽ

संगमनेर दि. १५ ऑगस्ट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढत असताना आघाडी सरकारमध्ये सहभागी असेलेले ‘जाणते राजे’ आणि शेतकर्यांंचे ‘कैवारी’ बोलत का नाहीतॽ असा सवाल माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. तालुक्यातील मनोली येथे संकल्प दूध संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आ.विखे पाटील यांच्या हस्ते झाले.पंचमहल दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर चौरे यांच्या … Read more

आणखी एक मंत्री कोरोना पाॅझीटीव्ह !

संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड-19 ची टेस्ट करुन घ्यावी. मुंबई दि. १५  ऑगस्ट ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची कोविड -19 ची चाचणी  पॉझिटीव्ह आली. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. बाळासाहेब पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर … Read more