इंजिनिअर बनण्याची सुवर्ण संधी!

….. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी १५ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये दुसऱ्या पाळीतील वर्गासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु. राज्यात 1 हजार 920 जागांवर मिळणार प्रवेश. मुंबई, दि. 18 ऑगस्ट.. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पात्र इच्छूक विद्यार्थ्यांनी यासाठी … Read more

निराशेचे मळभ दूर होवो आणि समृध्दी येवो!

_उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा. मुंबई, दि. 18 ऑगस्ट.. ‘अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला, कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला’…याच कृतार्थ भावनेने राज्यभरातील शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कृषी संस्कृतीतला हा महत्वाचा सण राज्यावर दाटलेले कोरोना संकटाचे, निराशेचे मळभ दूर करुन सगळीकडे उत्साह, चैतन्य, आनंद, समृध्दी घेऊन येईल, असा विश्वास … Read more

माजी आ.सुधाकरपंत परिचारक यांचे निधन..

पंढरपूर : 18 ऑगस्ट… जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते,  माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे पुणे येथे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातच मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. ते ८४ वर्षांचे होते. 5 ऑगस्ट रोजी परिचारक यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र श्वसनाच्या विकारामुळे रविवारपासून … Read more

गुरुजी म्हणाले, हुश्य…सुटलो बुवा !

मुंबई, दि. १७ ऑगस्ट…. राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोना संबंधित कामासाठी ज्या शिक्षकांच्या सेवा शासनाने अधिग्रहित केलेल्या आहेत त्या शिक्षकांना संबंधित कामातून कार्यमुक्त करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. तसे  आदेशही शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत. सरप्लस असणाऱ्या व सद्यस्थितीत कोणत्याही आस्थापनेवर समायोजन न … Read more

अजून संपलेली नाही माणुसकी !!

सातारा, दि. १७ ऑगस्ट….. कोरोनाने अख्खे जग मेटाकुटीला आले आहे. दररोजचे आकडे ऐकूनच पोटात गोळा येतो. बहुतांश खाजगी हॉस्पिटल्स व डॉक्टरांनी दुकान बंद करून पळ काढला आहे. या संकटाने माणसाला माणसापासून दूर केले आहे. नाती दूर झाली आहेत…पण यातही काही लोक असे आहेत ज्यांचा हेवा वाटतो, देवदुतासारखे हे लोक कोरोनाच्या संकटातही मदतीसाठी पुढे आले आहेत. … Read more

बदल्यांची CID चौकशी करा, नाहीतर ….।

  मुंबई, दि. 17  ऑगस्ट….. कोरोनाच्या महामारीमुळे राज्य गंभीर संकटात असूनही बदल्यांना परवानगी देताना राज्य सरकारने मनमानीपणे आपलेच धोरण बदलले, कोरोनाच्या उपाययोजनात सातत्य न राहिल्याने जनतेचे जीवित संकटात आले, बदलीच्या कायद्याचा भंग झाला, राज्याचे आर्थिक नुकसान झाले व बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत. बदल्यांच्या सीआयडी चौकशीचा आदेश द्यावा, अन्यथा न्यायालयात दाद … Read more

ठाकरे सरकारचा कोकणवासीयांसोबत दुजाभाव!

मुंबई, दि. 17 ऑगस्ट…. महाविकासआघाडी सरकारने दाखवलेल्या उदासीनतेमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या कोकणवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागला, असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. या निमित्ताने शिवसेनेचे कोकणवासीयांबद्दलचे प्रेम पुतना मावशी सारखे असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही दरेकर यांनी सांगितले. कोकणात जाणाऱ्या लोकांना विलगीकरण काळासाठी 12 ऑगस्टपूर्वी पोहोचणे गरजेचे … Read more

आबांचे ‘ते’ वक्तव्य आणि राजकारणाची खरी गोष्ट..

वरिष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांचा विशेष लेख….. मुंबई, दि.17 ऑगस्ट….. आर. आर. पाटील उर्फ आबा, एक दुर्मिळ राजकारणी-सामान्य-गरीब कुटुंबातून मोठा झालेला. त्यांच्या अवेळी जाण्याने त्यांच्या विचारांशी सहमत असलेले-नसलेले सगळेच हळहळले. त्यांच्या प्रतिमेला साजेशा आठवणी सगळ्यांच्या मनात आहेत. २६-११च्या हल्ल्यानंतर त्यांनी केलेले ते वादग्रस्त वक्तव्यं आणि त्यानंतर घडलेलं राजकारण यामुळेही ते अनेकांना वेळोवेळी आठवतात. तसंच त्यांच्या … Read more

अकलूजचे कोविड हॉस्पिटल आदर्श ठरेल!

पंढरपूर, दि.16 : कोरोना बाधित रुग्णांना वेळेत व योग्य उपचार मिळावेत यासाठी अकलूज येथे इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेले कोविड हॉस्पिटल संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरेल असे, प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशन व निमा संघटना यांच्या माध्यमातून सुसज्ज कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री … Read more

79 वर्षांच्या राज्यपालांनी पायीच सर केला शिवनेरी!

पुणे, दि. 17 ऑगस्ट  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, वय 79 वर्ष, या वयात त्यांनी  एका दमात तेही फक्त 50 मिनिटात शिवनेरी किल्ल्यावर पायी चढाई केली. त्यांचा फिटनेस पाहून सगळेच अवाक झाले. खरे तर त्यांना हेलिकॉप्टरने जाता आले असते पण या वयातही पायी शिवनेरी सर केला. किल्ल्यावर त्यांनी राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना … Read more