Ads

--

अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा !

By Xtralarge News

July 11, 2020 5:02 pm

Ads

बारामती, दि.११ जुलै २०२०

बारामती शहर व परिसरातील विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत, त्यामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. विकासकामे करताना रस्त्यांचे सुशोभिकरण, सेवा रस्त्यालगत झाडे लावण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे. शासकीय जागांमध्ये असणारी अतिक्रमणे हटवा तसेच अवैद्य वाळू उपसा, अवैद्य धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती शहर परिसरात सुरु असणाऱ्या विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेटी देत अजित पवार यांनी कामाचा आढावा घेतला. या भेटीत बारामती शहर ते माळेगाव येथील प्रस्तावित सेवा रस्ता, बारामती नगरपरिषद वाहनतळ, बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, गौतम बाग येथील कॅनलच्या दोन्ही बाजूला वाढविण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाची पाहणी अजित पवार यांनी केली.

या पाहणी दौऱ्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या ‘व्हिआयटी हॉल’ येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

No comments to show.

Leave a Comment