Ads

--

मुंबईची तुंबई झाली तर जबाबदारी भाजपाचीच.

By Xtralarge News

June 6, 2026 5:16 pm

Ads

मुंबईची तुंबई झाली तर जबाबदारी भाजपाचीच.

मुंबई, दि. ६ जून ..

मुंबईकरांना भ्रष्टाचारमुक्त शासन व स्वच्छ मुंबईचे आश्वासन देत महानगरपालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाने काही महिन्यातच त्यांचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली आहे. मे महिना संपून पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाईची कामे झालेली नाहीत. एका तुरळक पावसानेही पाणी तुंबल्याने बीएमसीतील भाजपा सरकार व मुंबई महापालिका प्रशासनाची पोलखोल झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईची पुन्हा तुंबई होईल असे दिसत आहे. मुंबईत पाणी साचले तर त्याची जबाबदारी भाजपाचीच असेल, प्रशासनावर जबाबदारी ढकलून चालणार नाही, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, फ्रंटल, डिपार्टमेंट, सेल, बीएलए १ आणि ब्लॉक समन्वयक यांची महत्त्वाची आढावा बैठक राजीव गांधी भवन येथे पार पडली. मुंबईच्या विविध भागांतील पक्ष संघटना आणि नागरी प्रश्न याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस आदी पदाधिकारी उपस्थित होते.

“निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेतून मुंबईतील एकाही व्यक्तीचे नाव मतदारयादीतून कमी होणार नाही. यासाठी आपापल्या विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. मतदार यादीत नावं असणाऱ्यासाठी योग्य ती कागदपत्रे सादर करावयाची असतात, त्याचा पाठपुरावा करा. सर्व कागदपत्रे असतानाही एखाद्या नागरिकाचे नाव मतदारयादीतून वगळले असेल तर त्याची दखल घेऊन ते नाव मतदार यादीत असेल यासाठी काम केले पाहिजे. भाजपा महायुतीचे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून पेट्रोल, डिझेल, सीएनजी दरवाढ, स्कूल बसची दरवाढ अशा लोकांच्या मुलभूत प्रश्नावर आवाज उठवा, मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची पोलखोल करा. मुंबईत काँग्रेस पक्षाची ताकद वाढली पाहिजे, यासाठी काम करा”, असे आवाहन मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी केले.

No comments to show.

Leave a Comment