ममता बॅनर्जींच्या TMC पक्षात उभी फूट..
कोलकाता, दि. ४ जून २०२६.
ममता बॅनर्जी यांना विधानसभेतील मोठ्या पराभवानंतर मोठा धक्का बसला असून महाराष्ट्र स्टाईल त्यांचा तृणमुल काँग्रेस पक्षात उभी फुट पडली आहे. तृणमूल काँग्रेसच्या २८ वर्षांच्या इतिहासात फूट पडून ५८ बंडखोर आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. या गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
विधिमंडळ पक्षावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले यासोबतच, त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडून मान्यताही मिळवली परिणामी. ममता बॅनर्जी यांना हा मोठा धक्का आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. विधानसभेत आपली ताकद सिद्ध केल्यानंतर, बंडखोर नेत्यांनी आता पक्षाच्या संसदीय गटावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. बंडखोर नेत्यांनी हे स्पष्टपणे नमूद केले आहे की, त्यांचा लढा ममता बॅनर्जी यांच्या विरोधात नसून अभिषेक बॅनर्जी यांचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी आहे.
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षातीन १९९८ साली बाहेर पडून तृणमुल पक्षाची स्थापना केली, त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालमध्ये इतिहास रचला. ३५ वर्षांची डाव्या पक्षांची सत्तेला सुरुंग लावत मोठा विजय मिळवला. सलग तीन विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. केंद्रातील भाजपा सरकारमध्ये सहभागी होत रेल्वेमंत्रीपदही भूषवले. त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालच्या तीनवेळा मुख्यमंत्रीपद भूषवले पण २०२६ च्या विधानसभेत त्यांचा व त्यांच्या पक्षाचा दारूण पराभव झाला आणि पराभवानंतर पक्षातही फूट पडली.
पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस पक्षात पडलेली फूट ही महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सारखीच आहे. शरद पवार यांनीही काँग्रेस पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
Leave a Comment