Ads

--

… अन्यथा ४० लाख ट्रॅक्टरची रॅली काढू !

By Xtralarge News

February 3, 2021 8:04 pm

Ads

… अन्यथा ४० लाख ट्रॅक्टरची रॅली काढू !
शेतकरी आंदोलकांचा मोदी सरकारला इशारा..

नवी दिल्ली, दि. ३ फेब्रुवारी:
नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांकडून राज्यांमधील तसंच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे.

कृषी कायद्यावरून सुरु असलेले आंदोलन संपण्याची काही चिन्हे दिसत नसून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. केंद्र सरकारने आमच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या नाही तर मोठी ट्रॅक्टर रॅली काढू असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.

टिकैत म्हणाले की, आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. जर त्यांनी आमचं ऐकलं नाही तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात रॅली काढू. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आम्ही प्रवास करु. येथील आंदोलनदेखील सुरुच राहणार. जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. तसेच ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून राज्यांमधील तसेच राष्ट्रीय महामार्गावर तीन तासांसाठी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.

 

No comments to show.

Leave a Comment