Ads

-

मोदींनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिम सुरु करावी

By Xtralarge News

January 11, 2021 8:49 pm

Ads

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी – नवाब मलिक.

मुंबई दि. ११ जानेवारी:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

१६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, सैन्यदल यातील लोकांना लसीकरण केले जाणार आहे. परंतु या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका आहे. त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली तर जनतेच्या मनातील भीती निघून जाईल असेही नवाब मलिक म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment