Ads

--

देशभरात 24 तासात 41 हजार कोरोना पेशंट

By Xtralarge News

November 28, 2020 10:55 am

Ads

देशभरात 24 तासात 41 हजार कोरोना पेशंट..

नवी दिल्ली, दि. 28 नोव्हेंबर :
कमी झालेले कोरोनाचे संक्रमण वाढत चालले असून शनिवारी एका दिवसात देशभरातून ४१ हजार कोरोना संक्रमित आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत ४१ हजार ३२२ नवीन रुग्ण आढळळे आहेत तर याच काळात ४८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे .

देशातील एकूण करोना संक्रमितांची संख्या आता ९३ लाख ५१ हजार ११० वर पोहचलीय. तर करोनामुळे आत्तापर्यंत एकूण १ लाख ३६ हजार २०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ४ लाख ५४ हजार ९४० रुग्णांवर उपचार सुरू आहे.

देशाचा रिकव्हरी रेट वाढून ९३.६७ टक्क्यांवर पोहचलाय. पॉझिटिव्हिटी रेट ३.५६ टक्के तर डेथ रेट १.४५ टक्के आहे.

लोकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे असून मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, अंतर ठेवणे याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

No comments to show.

Leave a Comment