Ads

--

काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार..

By Xtralarge News

December 26, 2025 10:50 pm

Ads

काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार..

मुंबई, दि. २६ डिसेंबर;

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ४१ नगराध्यक्ष विजयी झाले. या विजयी नगराध्यक्षांचा टिळक भवनमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला.

नगरपालिका निवडणुकीत १००६ नगरसेवक निवडून आले तर १०० नगरपालिकांमध्ये काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी पैशांचा वारेमाप वापर केला, पोलीसांचा वापर केला. निवडणूक आयोग त्यांच्या मदतीला होता. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करण्यात आली, मारहाण करण्यात आली, खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तरीही काँग्रेसचा कार्यकर्ता न डगमगता लढला व यश मिळवले, आज राज्यात काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे.

४१ ही संख्या फार मोठी नाही पण आजच्या विपरीत परिस्थितीत जे यश मिळवले आहे ते उल्लेखनीय आहे. जे विजयी झाले त्यांचे अभिनंदन आहेच पण जे पराभूत झाले त्यांचेही अभिनंदन आहे कारण त्यांना निर्धाराने लढा दिला असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘काँग्रेस लढणार, महाराष्ट्र जिंकणार’, या टॅगलाईनचे व टिझरचे प्रकाशन करण्यात आले.

No comments to show.

Leave a Comment