Ads

--

महात्मा फुलेंनी समाजाला समानतेचा मार्ग दाखवला..

By Xtralarge News

December 1, 2025 9:06 am

Ads

महात्मा फुलेंनी समाजाला समानतेचा मार्ग दाखवला..

पुणे दि. १ डिसेंबर  २०२५ :

महात्मा फुले यांच्या विचारांनी समाजाला समानतेचा मार्ग दाखवला. त्यांच्या स्मृतिदिनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून आपण लोकशाहीच्या मूल्यांची पुनःप्रचिती करून देत आहोत. मुलांना वह्या पुस्तकांचे वाटप, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपक्रम, तसेच निवडणूक प्रक्रियेत समाजातील तळागाळातील प्रश्नांना आवाज देणे हे शिवसेनेचे प्राधान्य आहे असे विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गो-हे म्हणाल्या..

महात्मा जोतीराव फुले यांच्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त फुलेवाडा येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या..

ऐतिहासिक भिडे वाडा स्मारकाच्या अंतिम टप्प्यातील कामाला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख निलेश गिरमे (शिवसेना युवासेना व फुलेवाडा–भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक समिती अध्यक्ष) यांनी केले. महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, शिवसेना प्रवक्ते व पत्रकार किरण सोनवणे, महाराष्ट्र युवा सेना सचिव किरण साळी, पुणे जिल्हा प्रमुख सोमनाथ कुटे, निलेश घारे, युवासेना उपशहर प्रमुख विशाल लोखंडे, कसबा मतदारसंघ अध्यक्ष ओंकार आढाव, उपाध्यक्ष अमोल कवितकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिला आघाडीच्या कल्पना थोरात (महानगर प्रमुख), सुदर्शना त्रिगुणाईत (शहर सहसंपर्कप्रमुख), सुरेखा कदम-पाटील, मीनल धनवटे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन करून लोकशाहीचा मूल्याधारित संदेश देण्यात आला. दलित समाजाच्या जमिनींचे प्रश्न, महिलांची सुरक्षा, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवणे—या सर्व बाबींवर आगामी अधिवेशनात लक्ष केंद्रित करण्याची बांधिलकीही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केली.

महात्मा फुले यांच्या विचारांना कृतीतून आदरांजली देत समाजात समतेचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.

No comments to show.

Leave a Comment