Ads

-

राज्यातील विद्यापीठांनी रँकिंग वाढवावे.. 

By Xtralarge News

November 27, 2025 9:13 pm

Ads

राज्यातील विद्यापीठांनी रँकिंग वाढवावे..

मुंबई, दि २७ नोव्हेंबर :-

महाराष्ट्रातील विद्यापीठांनी NIRF रँकिंग सुधारण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्याची गरज आहे,राज्यातील विद्यापीठ राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर अग्रस्थानी आणण्यासाठी सर्व विद्यापीठांनी प्रयत्न करावेत,अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन उंचवण्यासाठी आणि राज्यस्तरीय SIRF पोर्टल विकसित करण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक पार पडली.

राज्यातील विद्यापीठांची NIRF तसेच जागतिक रँकिंगमध्ये उंच भरारी घेण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली. विद्यापीठांनी संशोधनाची गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवणे, दर्जेदार शिक्षण देणे, आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणारी संशोधन प्रकाशने करणे, तसेच NAAC मानांकन सुधारण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव B. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मुंबईचे कुलगुरू डॉ. अनिरुद्ध पंडित व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment