Ads

--

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा…

By Xtralarge News

September 23, 2025 12:07 pm

Ads

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा…

मुंबई, दि. २३ सप्टेंबर २५ ;

महाराष्ट्रात अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात पावसाने झोडपून काढले आहे , असे असताना पालकमंत्री अजून जिल्ह्या मध्ये आढावा घ्यायला गेले नाही. या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असा इशारा आहे त्यामुळे लोकांना, जनावरांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, गरज पडल्यास अतिरिक्त NDRF च्या टीम तैनात करण्यात यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

पिकविम्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, सरकारने निवडणुकीच्या आधीचा जो जीआर आहे त्यानुसार शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना जास्त मदतीची अपेक्षा असल्याने प्रति हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे ही मागणी वडेट्टीवर यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment