Ads

---

अमित ठाकरेंसाठी भाजपच्या शेलारांकडून मोर्चेबांधणी.

By Xtralarge News

October 26, 2024 9:09 pm

Ads

 

मुंबई दि. 26 आक्टोबर :

हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे चिरंजीव निवडणुकीच्या मैदानात उतरले असतील, तर आपणही नाते जपायला हवे. आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील, तर महायुती म्हणून त्यांना समर्थन द्यायला हवे, असे मला वाटते. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे”, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी शनिवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी दिली.

वांद्रे येथे माध्यमांशी संवाद साधताना आ. शेलार बोलत होते. ते म्हणाले, भले उद्धव ठाकरेंना वाटत नसेल, तरी महायुतीने नाते जपायला हवे, असे मला वाटते. सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. पण, महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी. त्यातून जनतेत एक संदेश जाईल, अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली.

 

No comments to show.

Leave a Comment