Ads

--

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची वांद्र्यात हत्या.

By Xtralarge News

October 13, 2024 11:04 am

Ads

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर :-

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे येथे तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा होती तरीही त्यांच्यावर मुंबईतील वांद्रे भागात गोळ्या झाडल्या.

या घटनेवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागच्या सूत्रधारही शोधण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. झीशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी असल्याचेही असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

No comments to show.

Leave a Comment