मुंबई दि. २१ जून:
भगवा हा शिवरायांचा असून तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मी पुन्हा येईल पुन्हा येईल म्हणणा-यांचे बारा वाजले असून ते आता घरी जायाच्या तयारीत आहेत. आता लढाईची तयारी झाली असून आता माघार घ्यायची नाही. लढाई ही वैयक्तीक नसून संविधानाची लढाई असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन सोहळा माटुंगा येथील ष्णमुखानंद ह़ॉल या ठिकाणी पार पडला. यावेळी पक्षाचे सर्व निवर्निवाचित खासदार तसेच राज्यभरातील नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टिका केली. यावेळी ईशान्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार संजय दिना पाटील यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिवसेनेच्या 58 व्या वर्धापण दिना निमित्त माटुंग्याच्या ष्णमुखानंद हॉल मध्ये राज्यातील सर्व पदाधिकारी तसेच लोकसभेच्या निव़डणुकीत निवडुन आलेले सर्व नवनिर्वाचित खासदार यावेळी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा फॉर्म भरला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. आम्हाला गोमुत्र धारी हिंन्दत्व मान्य नाही. आम्हाला अतिरेक्यांना बडवणारे हिंन्दुत्व पाहिजे आहे. आम्हाला कोणी हिंन्दुत्व शिकवू नये. शिवसेना संपविणा-यांना आम्ही पुरुन उरलो आहोत. यावेळी शिवसेना ही कार्यकर्त्यांची आहे. आपल्याला पुर्वजांचे आशिर्वाद आहे म्हणुन आपण असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
Leave a Comment