Ads

---

सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करा

By Xtralarge News

May 20, 2024 1:51 pm

Ads

ठाणे, दि. २० मे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्यून आय टी पार्कमधील मतदान केंद्रात सहकुटुंब जाऊन मतदान केले.

मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, सकाळपासून मतदानासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून येत असून, सुदृढ लोकशाहीसाठी  तसेच देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी, महासत्ता बनवण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकण्यासाठी आवर्जून मतदान करा.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली श्रीकांत शिंदे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

कल्याण डोंबिवलीचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आज आई लता शिंदे आणि पत्नी वृषाली शिंदे यांनी ओवाळून शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते. गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास आणि दोन वर्षात महायुतीच्या सरकारने केलेले काम याच्या बळावर मुंबईसह एमएमआर मधील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील आणि येत्या ४ जून रोजी विरोधकांची तोंडे पूर्णपणे बंद होतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

No comments to show.

Leave a Comment