Ads

--

ईशान्य मुंबईत संजय दिना पाटलांच्या प्रचाराला वेग.

By Xtralarge News

April 15, 2024 12:27 pm

Ads

मुंबई, दि. १५ एप्रिल;

मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी आज मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांची भेट घेतली. चेंबुर येथे झालेल्या या बैठकीत निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे या बैठकीत नेमके काय झाले हे गुलदस्त्यात आहे.

मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील हे मुंबईत आले होते. चेंबुर येथे झालेल्या सभे नंतर ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी जरांगे यांची भेट घेतली. मात्र या भेटीने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संजय पाटील यांनी घाटकोपर रमाबाई कॉलनी, कामराज नगर, नित्यानंद नगर, भांडुप, मुलुंड पुर्व पश्चिम या ठिकाणी अनेक मंडळांना भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. त्याच प्रमाणे आज बैसाखी असल्याने संजय पाटील यांनी मुलुंड पश्चिमेला असलेल्या गुरुव्दार मध्ये जाऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्या राजोल पाटील उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांनी मुलुंड पुर्व येथे व्यापारी असोसिएशन वेलफेअर ट्रस्ट आणि कच्छ युवक संघ यांच्यावतिने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी संजय पाटील यांनी भेट दिली.

No comments to show.

Leave a Comment