Ads

--

भाजपा स्थापना दिवस उत्साहात साजरा.

By Xtralarge News

April 6, 2024 10:18 pm

Ads

मुंबई, दि ६ एप्रिल :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष अविरत परिश्रम घेत आहे. पक्षाचा हा प्रवास एक अथक आणि अखंड प्रवास आहे, हा प्रवास प्रयत्नांच्या पराकाष्टेचा आहे. हा प्रवास समर्पणाच्या आणि संकल्पाच्या शिखराचा आहे असे मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार म्हणाले.

भारतीय जनता पक्षाच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त शहर, उपनगरात विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली तसेच सामान्यांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळाला. भाजपा मुंबई अध्यक्ष. आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई भाजपा वसंतस्मृती कार्यालयात ध्वजारोहण झाले.

भाजपा मुंबईच्या सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने ध्वजारोहण तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १०० मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी वरळी येथील भाजपा वॉर्ड क्रमांक १९६ तर्फे आयोजित मेडिकल कँपला भेट दिली तसेच उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  खा. मनोज कोटक यांनी कार्यालय आणि निवासस्थानी ध्वजारोहण केले. आ. अतुल भातखळकर यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. आ. राम कदम यांनी  घाटकोपर पश्चिम मतदारसंघतील सात निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. आ. योगेश सागर यांनी कांदिवली येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. आ. सुनील राणे यांच्या उपस्थितीत बोरीवलीत ज्येष्ठ भाजपा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. आ. प्रवीण दरेकर यांनी दहिसर येथील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण केले. भाजपा दक्षिण मध्य जिल्ह्याच्या वतीने दादर शिवाजी पार्कवर ‘अबकी बार चारसो पार’ संदेश असणारे पतंग उडविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी केले.

No comments to show.

Leave a Comment