Ads

--

चार वर्षांत मेट्रो आणि रस्त्यांचे नेटवर्क..

By Xtralarge News

January 13, 2024 1:35 pm

Ads

मुंबई, दि. १३ जानेवारी :

मुंबईत कुठूनही 59 मिनिटात पोहोचता आले पाहिजे. मेट्रो आणि रस्त्यांचं नेटवर्क त्या पद्धतीने तयार होत आहे. येत्या तीन ते चार वर्षांत असे नेटवर्क तयार होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.

रायगड, नवी मुंबई हे नवे इंडस्ट्रियल हब असेल. येथे नवीन विमानतळ लवकरच पूर्ण होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची शक्ती आमच्यामागे उभी असल्यामुळे राज्यातील पायाभूत प्रकल्प लवकर पूर्ण होतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

1973 मध्ये या सागरी सेतूची संकल्पना मांडली होती मात्र 40 वर्षात हे काम झाले नाही ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले आहे. या अटल सेतूसाठी प्रधानमंत्री यांनी थेट एम.एम.आर.डी.ए. ला कर्ज उपलब्ध करुन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

गेल्या 50 वर्षांत महाराष्ट्राला आणि देशाला मुंबईने ताकद दिली. येत्या 25 वर्षांते देशाला, महाराष्ट्राला आणि मुंबईला कोण ताकद देईल तर तो रायगडचा परिसर देईल. रायगडमध्ये नवा इकॉनॉमिक हब तयार होणार आहे. 65 टक्के डेटा सेंटर कॅपासिटी तयार झाली आहे.

आता रायगड आणि नवी मुंबई आता देशाला आणि महाराष्ट्राला ताकद देतील. या भागात नवीन विमानतळ होत आहे. त्याचेही भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. यावर्षी तेही सुरु होणार. सूर्या पाणीपुरवठा योजना आणि इतरही अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन झाले आहे. यातून लाखो नागरिकांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडणार आहे.

पहिल्यांदा मुंबई आणि एमएमआरला एकप्रकारचा रिंगरोड मिळाला आहे. मोदीनी संकल्पना मांडली की, मुंबईत एका टोकातून दुसर्‍या टोकाला जायचे असेल तर एक तासात पोहोचता आले पाहिजे. ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो आहे असे फडणवीस म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment