Ads

---

… हा निकाल निर्लज्जपणाचा कळस !

By Xtralarge News

January 10, 2024 9:16 pm

Ads

…. हा निकाल निर्लज्जपणाचा कळस !

मुंबई, दि. १० जानेवारी :

शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात दीड वर्षानंतर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, हा निर्णय म्हणजे मूळ राजकीय पक्षासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे, लोकशाहीची हत्या करणारा आहे . विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय म्हणजे देशासाठी मोठे संकेत आहेत . २०२४ मध्ये अशा प्रकारची गद्दारी झाली, खोक्यांचं राजकारण झालं तर असच त्यांना वाचवलं जाणार.. असे म्हणत शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी निर्णयावर प्रतिक्रिया दिली..

विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय संविधानाला धरून नाही, असं म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेलं संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान आणायचं आहे. ते स्पष्ट झालं . अनेक वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते ? नार्वेकरांनी पक्षप्रमुखांच्या अधिकारासंदर्भात दिलेल्या निर्णयावर आदित्य ठाकरेंनी म्हटले. लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही . लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल पण आता सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण त्याहून अधिक अपेक्षा जनतेकडून आहेत.. असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला .

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढली जाईल . असा इशारा देतानाचं ‘आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेली आहे, असं असतानाही अशा प्रकारचा निर्णय येतो हे धक्कादायक आहे . जगाला आता कळलय की आपल्या देशात लोकशाहीची हत्या झाली आहे . देशात हिटलर शाही सुरू झालेले आहे.. आणि या अन्यायाविरुद्ध लढत राहणार’ , असा निर्धार आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला .

No comments to show.

Leave a Comment