Ads

--

वाजपेयींच्या जयंतीनिमित्त भाजपाचे विविध सामाजिक उपक्रम..

By Xtralarge News

December 26, 2023 6:42 pm

Ads

वाजपेयींच्या जयंतीनिमित्त भाजपाचे विविध सामाजिक उपक्रम..

मुंबई, दि. २६ डिसेंबर :
मुंबई भाजपाच्या वतीने माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत विनम्र अभिवादन करण्यात आले.

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वांद्रे विधानसभेत विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिर घेण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या मोफत आरोग्य योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. कॅबिनेट मंत्री ॲड मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात मलबार हिल विधानसभेत आयुष्यमान कार्ड नोंदणी, वितरण करण्यात आले. खा. मनोज कोटक यांनी पवई येथील कार्यक्रमात आदरांजली वाहिली. खा. गोपाळ शेट्टी यांनी कांदिवली पूर्व येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, अटल बिहारी वाजपेयी उत्कृष्टता केंद्र येथे पुतळ्यास अभिवादन केले. आ. विद्या ठाकूर यांच्या नेतृत्वात गोरेगाव येथे मेगा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आ. सुनील राणे यांच्या हस्ते बोरिवली गोराई मैदान येथे बालकांना आईस्क्रीम आणि फळवाटप तसेच कांदिवलीत मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. आ. मनीषा चौधरी, आ. प्रसाद लाड यांनी अभिवादन केले. जोगेश्वरीत वॉर्ड अध्यक्ष राम शिंदे यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन झाले.

No comments to show.

Leave a Comment