Ads

---

नरेंद्र मोदी संविधान बदलणार नाहीत…

By Xtralarge News

November 6, 2023 8:35 pm

Ads

नरेंद्र मोदी संविधान बदलणार नाहीत…

 

भोपाळ दि. 6 नोव्हेंबर –

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधानाचे पुजक आहेत, संविधानाचे रक्षक आहेत, संविधानाला नतमस्तक होऊन ते देशाचा कारभार चांगला चालवित आहेत त्यामुळे ते कधीही संविधान बदलु शकत नाहीत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेले संविधान जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान आहेत. ते परिपूर्ण आहे त्यामुळे भारतीय संविधान कधीही कोणतीही शक्ती बदलु शकत नाही, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले भोपाळमध्ये म्हणाले.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकित भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भोपाळ मधील आंबेडकरनगर, पंचशीलनगर, प्रियदर्शीनी नगर, कोनार या आंबेडकरी बौध्द वसाहतींमध्ये पदयात्रा आणि जाहिर सभांना आठवले यांनी संबोधित केले.

काँग्रेस हे संविधानाच्या मुद्यावर जाणीवपुर्वक आंबेडकरी जनेतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करित आहे. भारतीय संविधान हे परिपूर्ण आहे ते बदलण्यासारखे नाही. जगातली कोणतीही शक्ती डॉ.बाबासाहेबांनी दिलेले भारताचे संविधान बदलु शकत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधानच्या गौरवासाठी संसदेचे स्वतंत्र अधिवेशन घेतले होते तसेच देशात 26 नोव्हेंबर हा संविधान गौरवदिन म्हणुन सरकार तर्फे साजरा करण्याची परंपरा मोदी यांनी सुरू केली आहे. नरेंद्र मोदी हे संविधानपुजक आहेत असे रामदास आठवले म्हणाले.

 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महु येथील जन्मभुमिस्मारक,दिल्ली येथील 26 अलिपूर रोड येथील निर्वाणभुमि स्मारक,मुंबईतील चैत्यभूमि स्मारक,नागपुरची दिक्षाभुमि,लंडन मधील स्मारक या पंचतिर्थस्थळांचा मोदी सरकारने विकास केला.देशात बौध्द स्थळांना जोडणाऱ्या बुध्दीस्ट सर्कल योजना ही नितीन गडकरी यांनी रस्ते मार्ग मंत्रालया द्वारे सुरु केली.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे.मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले असून यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेशचा विकास होत आहे. आंबेडकरी जनतेने काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता भाजपच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

 

No comments to show.

Leave a Comment