Ads

--

तुमचे ते मेरिट आणि आमची ती घराणेशाही ?

By Xtralarge News

August 3, 2023 11:06 pm

Ads

तुमचे ते मेरिट आणि आमची ती घराणेशाही ?

नवी दिल्ली, दि. ३ जुलै ;

भाजपाकडून कायमच आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करत असते. घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करता मग एनडीएची बैठकीत जी. के. वासन, चिराग पासवान, प्रफुल पटेल, दुष्यंत चौटाला हे सगळे असतात. हे सगळे घराणेशाहीचं मेरिट सांगणारे नाहीत का? तुमच्या बरोबर असले तर मेरिट आणि बरोबर नसलो तर घराणेशाही असं कसं काय चालेल? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला विचारला.

संसदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, भाजपा खासदारांची, आमदारांची पहिली, दुसरी आणि तिसरी पिढी राजकारणात झाली तरीही चालतं. मात्र आम्ही केलं तर ती घराणेशाही असते. माझ्या मतदारसंघात जाऊन भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी काय म्हटलं होतं? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी आहे. मला आता यांच्याकडून स्पष्टीकरण हवं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रात सत्तेत कशी काय? आम्ही तुमच्या बरोबर आलो तर चांगले आणि विरोधात गेलो तर वाईट असं नसतं. ही लोकशाही आहे लोकशाहीत असं घडत नाही असंही सुप्रिया सुळें यांनी स्पष्ट केले आहे.

हे सगळे आता नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत. यांनी सांगितलं दिल्लीच्या सचिवांना मारहाण झाली. जर तुमच्याकडून चूक झाली आहे. मीनाक्षी लेखींनी मांडलेल्या मुद्द्याशी मी सहमत आहे. मग महाराष्ट्रात काय झालं? तिथे अधिकाऱ्यालाही मारहाण झाली. तिथे तुमचे १०५ आमदार आहेत. महाराष्ट्रातही अधिकाऱ्याला मारहाण झाली ती बाबही चुकीचीच आहे असंही सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.

 

No comments to show.

Leave a Comment