Ads

----

लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस- शिवसेना एकत्र

By Xtralarge News

April 18, 2023 11:19 am

Ads

लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस- शिवसेना एकत्र…

मुंबई, दि. १८ एप्रिल;

देशात मीकरणाच्या विरोधात एक समीकरण बनले आहे म्हणून सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. प्रत्येक पक्षाची स्वतः ची विचारधारा आहेच. त्यालाच लोकशाही म्हणतात म्हणून आम्ही एकत्र आलोय. निवडणुका समोरच उभ्या आहेत लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख  उध्दव ठाकरे यांनी स्ष्ट केले.

काँग्रेस महासचिव के. सी. वेणूगोपाल राव आणि उद्धव ठाकरेंची  मातोश्रीवर जाऊन भेट घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचा भेटीचा उद्देश वेणूगोपाल यांनी स्पष्ट केला. मागे भाजपचे अध्यक्ष नड्डा बोललेले फक्त भाजप राहील इतर सगळे पक्ष संपतील. शिवसेना संपवावी यासाठी भाजपचे प्रयत्न. भाजपला सत्तेचा हव्यास लागला असून ते सत्ताभक्षक झाले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली आहे. वेणूगोपाल यांचे आणि काँग्रेसचे आभार मानतो. आम्ही मैत्री करतो तर पूर्ण मनापासून निभवतो एक नाते निर्माण होतो. भाजप सोबत २५-३० वर्ष होतो पण होतो पण त्यांना किंमत नव्हती पण ठिक आहे त्यांना मित्र आणि शत्रू समजले नाहीत. लोकांच्या मनात प्रश्न आहेत ते आपल्याला साथ देतील. आमच्या भेटीगाठी सुरु राहतील.

उद्धव ठाकरे यांच्या लढाईत काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे असा विश्वास व्यक्त करून के. सी. वेणुगोपाल यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिल्ली भेटीचे आमंत्रण दिले. दिल्ली भेटीत सोनिया गांधी व राहुल गांधी यांची उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा होईल असे त्यांनी सांगितले.

No comments to show.

Leave a Comment