Ads

--

अजब गजब! गाढविणीच्या दूधाची डेअरी…

By Xtralarge News

August 24, 2020 5:17 pm

Ads

 

मुंबई, दि. २४ ऑगस्ट २०२०

तुम्ही आतापर्यंत गाईचे दूध, म्हशीचे दूध, शेळीचे दूध पाहिले आहे वापरलेही आहे. यातील गाई व म्हशीच्या दूधापासून दही, ताक, पनीर, तूप, आईस्क्रिम, पेढा असे अनेक पदार्थ बनवले जातात. दूध पिण्याचे फायदेही अनेक आहेत.

शेतीला जोडधंदा म्हणूनही गाई, म्हशी पाळून त्याचे दूध डेअरीला घातले जाते. हा करोडो रुपयांचा उद्योग होते. त्यात गावातील छोट्या मोठ्या दूध डेअऱ्यापासून अमूल, गोकुळ, महानंद सारखे मोठे प्रकल्पही साकारले आहेत. हे सगळे आपण पाहिले आहे, आजही पाहत आहोत. पण तुम्हाला जर असे सांगतिले की, गाढविणीच्या दूधाची डेअर सुरु होत आहे तर !….चक्रावलात ना…?

पण हे खरे आहे, देशात पहिल्यांदाच गाढविणीच्या दुधाची डेअरी सुरु होत आहे. हरियाणातील नॅशनल हॉर्स रिसर्च सेंटर, हिसार येथे ही दूध डेअरी सुरू होत आहे. या डेअरीतून खास हलारी जातीच्या गाढविणीचे दूध विकले जाणार ईहे. त्यासाठी हिलारी जातीच्या १० गाढविणीही आणल्या आहेत.

लहान मुलांना कधी कधी म्हशीचे दूध पचत नाही, ऍलर्जी होते असे म्हटले जाते पण या गाढविणीचे दूध लहान मुलांनाही पाचक आहे, त्यापासून कसलीही ऍलर्जी होत नाही. या दुधात फॅटही कमी प्रमाणात असते असे या दूधाचे संशोधन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

हिलारी जातीच्या गाढविणीचे दूध रोगप्रतिकारशक्ती वाढवते, कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांचा सामना करण्याची क्षमता या दूधात आहे. हे दूध पिल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. हिलारी जातीच्या या गाढविणाच्या दुधापासून साबण, लीप बाम, बॉडी लोशन अशी सौंदर्य प्रसादनेही तयार केली जातात.

लवकरच या डेअरीचे काम सुरू होऊन गाढविणीचे हे दूध बाजारात विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न आहे.एवढे सगळे फायदे असलेल्या हिलारी जातीच्या या गाढविणीच्या एक लिटर दुधाची किंमत किती आहे….माहित आहे… फक्त ७००० हजार रुपये !

 

No comments to show.

Leave a Comment