Ads

--

निचपणा: करोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगातून घेतले स्वॅब !

By Xtralarge News

July 30, 2020 6:15 pm

Ads

अमरावती, दि 30 जुलै 2020

कोरोनाच्या संकटाने सर्वजण त्रस्त आहेत पण या संकटातही काहीजण हात धुवून घेत आहेत. मेडिकल फिल्डमध्येही काहीजण या संधीचा गैरफायदा घेत अक्षरशः लूटत असल्याचे उघड झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरामध्ये तर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाची लागण झाली आहे का याची टेस्ट करण्यासाठी गेलेल्या एका तरुणीच्या गुप्तांगाचे स्वॅब घेण्याचा निचपणा लॅबमधल्या टेक्निशियने केला आहे.

ही तरुणी एका माॅलमध्ये काम करत होती, तेथिल  एका कर्मचा-याला कोरोना झाल्याचे समोर आल्यानंतर तीनेही कोरोना चाचणी करण्यासाठी शहरातील चाचणी केंद्र गाठले.२८ जुलैला या तरुणीचे स्वॅब घेण्यात आले. मात्र, त्यानंतर या तरुणीला टेक्निशियने पुन्हा लॅबमध्ये बोलावून तुमचा करोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे असे सांगून युरिनल चाचणी करावी लागेल, असे सांगितले. तरुणीने हा प्रकार आपल्या महिला सहकाऱ्याच्या कानावर घातला. लॅबमध्ये नमुने घेण्यासाठी महिला कर्मचारी नाही का अशी विचारणा केली असता तुम्ही तपासणीसाठी एखाद्या महिलेला सोबत घेऊन येऊ शकता, असे त्या टेक्निशियने सांगितले आणि नंतर या हरामखोर टेक्निशियने या तरुणीच्या गुप्तांगाचे स्वॅब घेेतले.

हा सर्व प्रकार या तरुणीला संशयास्पद वाटला आणि तीने हा प्रकार भावाला सांगितला. नंतर दोघांनी डाॅक्टरांकडून माहिती घेतली असता अशा प्रकारे गुप्तांगाचे स्वॅब घेतले जात नाहीत असे त्यांना सांगितले. त्यानंतर या तरुणीने भावाच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली असता पोलिसांनी त्या हरामखोराला अटक करून पोलीस कोठडीत रवानगी केली आहे, त्याच्यावर विनयभंगासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अल्पेश देशमुख असे या ३० वर्षीय आरोपीचे नाव असून तो अमरावतीतील पुसदा येथील रहिवासी आहे.

झालेला प्रकार संतापजनक असून त्या नराधमाला कडक शिक्षा झाली पाहिजे, असे अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

अशी स्वॅब टेस्ट करावी लागेल असे जर कोणी सांगितले तर महिलांनी-तरुणींनी तातडीने महिला डाॅक्टर यांच्याकडे चौकशी करावी आणि अशा भामट्यापासून आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.

No comments to show.

Leave a Comment