Ads

--

बोगस बियाण्यांबाबत कारवाई करताना मुळावरच घाव घाला !

By Xtralarge News

July 8, 2020 2:53 pm

Ads

मुंबई, दि. ८ जुलै २०२०

बोगस बियाण्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असून शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली जाते परंतु त्यावर फार काही होताना दिसत नाही. थातुरमाथूर कारवाई करण्याचे सोपस्पार पार जातात. यावर्षीही सोयाबीनचे बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. हाच धागा पकडत बोगस शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करताना मुळावरच घाव घाला, असे आवाहन उपमुख्यंत्री अजित पवार यांनी केले आहे.

कोरोना काळात सगळे घरी असताना शेतकरी काळ्या आईच्या सेवेसाठी राबतोय. शेतकऱ्याला एक गोष्ट मात्र घरी बसून मिळणार आहे ती म्हणजे सर्व योजनांचा लाभ घेण्याची सुविधा. कोरोना काळात शेतकऱ्यांना बांधावर खते पुरविली गेली त्याचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. कृषीमंत्री केवळ मंत्रालयात बसून राहीले नाहीत तर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जातात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांच्या शेतात नांगर धरतात, बियाणे पोहोचवतात असे सांगत उपमुख्यमंत्र्यानी कृषिमंत्र्यांचे कौतुक केले. कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना अभिवादन करतानाच त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञताही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

 

No comments to show.

Leave a Comment