‘पुन्हा येईन…पुन्हा येईन’ म्हणत कोरोना पुन्हा आला!

0
20210303_182947

‘पुन्हा येईन…पुन्हा येईन’ म्हणत कोरोना पुन्हा आला!

मुंबई, दि. ३ मार्च:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षावर आज तुफान हल्लाबोल केला. विरोधकांनी कोरोना काळात सरकारने केलेल्या कामावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘पुन्हा येईन… पुन्हा येईन’ असे म्हणत कोरोना पुन्हा आला.

मुख्यमंत्री म्हणाले, आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावं? काय करू नये, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला. ज्या लोकांनी मला संपर्क केला. जो मला प्रतिसाद मिळाला, त्यात महाराष्ट्रातील जनता मला मानायला लागले. ही माझ्या आयुष्यातील मोठी कमाई आहे. पण, मी नेमकं काय करत होतो. आज जी परिस्थिती तयार झाली आहे, कोरोनाची पुन्हा दुसरी लाट येतेय की काय? अशी शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढतेय. लॉकडाउन करायचा की नाही. मी फेसबुक लाईव्हमधून तेच सांगत होतो. निष्काळजीपणा करू नका. कारण हा व्हायरस आहे. तो म्हणतोय मी पुन्हा येईन…पुन्हा येईन. काळजी घ्या. दुर्दैवानं थोडसं इकडेतिकडे झालं आणि व्हायरस पुन्हा परत आला,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेचा फायदा कोरोना लसीकरणामध्ये होत आहे. सध्या मी जबाबदार योजना राबवली जात आहे. सरकार काम करत आहे. देशातील सर्वात मोठं जम्बो कोविड हॉस्पिटल सरकारने राज्यात उभारले. महाविकासआघाडी सरकारने कोरोना काळात नागरिकांना पाच रुपयांना शिवभोजन थाळी दिली. आम्ही रिकाम्या थाळ्या वाजवल्या नाही. राज्यपालांनी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. विरोधकांनी नुसत्याच थाळ्या वाजवल्या, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील एकही कोरोना रुग्ण लपवलेला नाही किंवा एका रुग्णाचाही मृत्यू लपवलेला नाही.

सरकार आवश्यक ती खबरदारी घेत आहे. देशातील सर्वात मोठं कोविड सेंटर आपण सुरु केलं. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशा सुविधा नव्हत्या, त्या वाढवल्या, असं म्हणत त्यांनी भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळाले. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत महसूल, आरोग्याचे कर्मचारी राज्यात घरोघर गेले. यामुळे सहव्याधी असलेले रुग्ण लक्षात आले. सरकार खबरदारी घेत आहे. देशात जगात पहिले जम्बो हॉस्पिटल आपण उभे केले. किती जणांना उपचार दिले ही माहिती ही आपल्याकडे आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *