Ads

--

कोरोना चाचणी आता 700 रुपयात!

By Xtralarge News

December 16, 2020 10:49 am

Ads

कोरोना चाचणी आता 700 रुपयात!

मुंबई, दि. 16 डिसेंबर:

राज्यातील ठाकरे सरकारने कोरोना चाचणीचे दर आणखी कमी करून जनतेला दिलासादायक दिला आहे. सातव्यांदा ही दर कपात करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

कोरोना चाचणीत 280 रुपयांची कपात करण्यात आली असून आता या चाचणीसाठी 700 रुपये मोजावे लागणार आहेत. राज्याचा रुग्णवाढीचा दर हा 0.21 इतका असून केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना चाचणीसाठी सुरुवातीला भरमसाठ दर आकारले जायचे. खासगी प्रयोगशाळेत या चाचणीसाठी तब्बल 4500 रुपये आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा वापर यामुळे 5200 रुपये आकारले जात होते. नंतर त्यावर सरकारने नियंत्रण आणलं. राज्य सरकारने हे दर कमी केले. सप्टेंबर महिन्यात 980 रुपये त्यानंतर आता 700 रुपये दर करण्यात आले आहेत.

 

No comments to show.

Leave a Comment