Ads

---

राज्यातील पोलिसांसाठी मोठी बातमी…….

By Xtralarge News

June 26, 2020 6:14 pm

Ads

मुंबई, दि. २६ जून २०२०

कोविड-१९ च्या लढाईत पोलीस दल पहिल्या दिवसापासून सक्रीय असून मागील तीन महिन्यात राज्यातील ५४ पोलीस कोविड-१९ मुळे दगावले आहेत. पोलीसांचे हे बलिदान लक्षात घेऊन राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. जे पोलीस कर्तव्य बजावत असताना कोविड १९ मुळे मृत्यू पावले त्यांच्या कुटुंबियांनी घराची चिंता करुन नये. मयत पोलिसाच्या रिटायरमेंटपर्यंत हे कुटुंब सरकारी पोलीस क्वॉर्टरमध्ये राहू शकतात अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

याचबरोबर कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या पोलिसाच्या कुटुंबियांना प्रत्येकी ६५ लाख दिले जाणार आहेत. या लढाईत आतापर्यंत ४३२६ पोलिसांना कोवीड १९ ची लागण झाली होती त्यातील ३२८२ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत परंतु दुर्दैवाने ५४ जणांचा मृत्यू झाला आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

No comments to show.

Leave a Comment