Ads

--

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच !

By Xtralarge News

November 30, 2020 12:21 pm

Ads

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच..

नवी दिल्ली, दि. 30 नोव्हेंबर:

केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना देशभरातून तीव्र विरोध होत आहे. उत्तर भारतातील शेतक-यांनी दिल्लीवर धडक दिली आहे. शेतकरी आक्रमक झाले असून मोदी सरकारविरोधात त्यांनी संघर्ष सुरू केला आहे. देशभरातून विरोध असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र हे कायदे शेतक-यांच्या हितासाठीच आहेत हे सांगण्यासाठी जोर देत आहेत.

कृषी कायद्यासंदर्भात ‘मन की बात’ मध्ये मोदी म्हणाले, ‘नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना नव्या संधींची दारं उघडणारे आहेत. शेतकऱ्यांच्या हिताच्याच गोष्टी त्यामध्ये आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांसमोरील प्रश्न सुटणार आहेत’.

बराच विचार केल्यानंतर संसदेनं कृषी सुधारणांना कायद्याचं स्वरूप दिलं आहे. या सुधारणांमुळे केवळ शेतकऱ्यांची बंधनंच नष्ट झालेली नाहीत, तर त्यांना नवे हक्कदेखील मिळाले आहेत. नव्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत.

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांची केवळ जोखडातून सुटका झालेली नाही तर त्यांना नवे अधिकार प्राप्त झाले आहेत. या अधिकारांमुळे शेतक-यांच्या समस्या सुटण्यास अल्पावधीतच सुरुवात झाली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment