Ads

--

महाराष्ट्रात २४ तासात ५ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्ण.

By Xtralarge News

November 24, 2020 10:02 pm

Ads

महाराष्ट्रात २४ तासात ५ हजारांपेक्षा जास्त करोना रुग्ण..

मुंबई, दि. २४ नोव्हेंबर:
कोरोनाची रुग्ण संख्या दिवाळीपासून हळूहळू वाढत आहे. मागील २४ तासात महाराष्ट्रात ५४३९ नवे करोना रुग्ण आढळले. तर ३० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.राज्यात आत्तापर्यंत एकूण १६ लाख ५८ हजार ८७९ करोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात ९२.६९ टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३ लाख ६६ हजार ५७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ८९ हजार ८०० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

सध्या राज्यात ५ लाख ३६ हजार ६४९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार २११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. तर ८३२२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

No comments to show.

Leave a Comment