Ads

--

कोरोना गर्दीत चेंगरून मेला की काय ?

By Xtralarge News

November 22, 2020 11:06 pm

Ads

कोरोना गर्दीत चेंगरून मेला की काय ?

अजित पवार यांचा मिश्किल टोला….
पुणे, दि. 22 नोव्हेंबर:
कोरोना विषाणूचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने सरकार काम करीत आहे. मात्र दिवाळी सणानिमित्त रस्त्यावर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली. पुण्यातील बाजीराव रोडवर एवढी गर्दी झाली की, गर्दीत कोरोना चेंगरून मेला की काय असे मला वाटले, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका मेळाव्यात केला.

अजित पवार म्हणाले की, एकदा कोरोना झाला म्हणजे पुन्हा होत नाही. हे मनातून काढून टाका, पुन्हा मानगुटीवर बसू शकतो. त्यामुळे सर्वानी काळजी घ्यावी आणि सर्व नियमांचे पालन करावे तसेच आता कोरोना आजाराची दुसरी लाट येणार असे अनेक तज्ञ मंडळी सांगत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाकडून येणार्‍या नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

 

No comments to show.

Leave a Comment