Ads

--

कोरोना वाढला, अहमदाबादमध्ये रात्रीचा कर्फ्यू!

By Xtralarge News

November 20, 2020 9:11 pm

Ads

कोरोना वाढला, अहमदाबादमध्ये रात्रीचा कर्फ्यू !

अहमदाबाद, दि. 20 नोव्हेंबर:
अनलाॅकमुळे जनजीवन सुरुळीत सुरू होत असताना कोरोनाचे रुग्णही वाढू लागले आहेत. दिल्ली, हरियाणा नंतर अहमदाबादमध्येही कोरोनाने चिंता वाढवली आहे.
अहमदाबाद महानगरपालिकेने शहरात पुन्हा संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे तसेच मास्क घालण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. रात्रीच्या संचारबंदी दरम्यान फक्त आवश्यक वस्तूंची दुकानेच खुली राहतील.

अहमदाबादसाठी २० अतिरिक्त रुग्णवाहिका, ३०० डॉक्टर. अहमदाबादमधील ७ शासकीय रुग्णालये आणि ७६ खासगी कोविड रुग्णालयांसह ७२७९ बेड आहेत. यापैकी १५०० बेड सध्या रिक्त आहेत. यापैकी शासकीय रुग्णालयात १००० बेड रिकाम्या ठेवत्यात आल्या आहेत.

दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तेथेही संचारबंदी लागू करण्याचा केजरीवाल सरकारचा विचार आहे.

 

No comments to show.

Leave a Comment