‘आरोग्य सेतू’चा निर्माता कोण? माहित नाही!

0
20201029_111433

मुंबई, दि. २९ ऑक्टोबर:
नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नाही. जबाबदारी तर कोणताही मंत्री घेत नाही. कांदा महाग झाला तर अर्थमंत्री म्हणतात मी कांदा खात नाही. अर्थव्यवस्थेबद्दल विचारले तर म्हणतात, ती देवाची करणी आहे आणि काहीही झाले तर ७० वर्षांचा परिणाम म्हणत काँग्रेसला शिव्या देण्याचे काम सुरुच असते.
यावर कहर म्हणजे कोरोनासंदर्भात मोदी सरकार जे ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’ वापरा असा आग्रह धरत होते. अनेक ठिकाणी ते ऍप अनिवार्यही करण्यात आले होते. ते ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’ कोणी बनवले, त्याचा निर्माता कोण हेच मोदी सरकारला माहित नाही. आता झाली का पंचायत…ज्याच्या विषयी एवढा अट्टाहास केला त्याचा निर्माता कोण हेच मोदी सरकारला माहित नाही.

हा सावळा गोंधळ झाला तो एका आरटीआयमुळे. आरोग्य सेतू अ‍ॅपची निर्मिती कोणी केली. कोणत्या कायद्याखाली हे अ‍ॅप कार्यरत आहे आणि या अ‍ॅपद्वारे जमा करण्यात आलेल्या माहितीच्या हाताळणीसाठी स्वतंत्र कायदा करणार आहे का, याबाबत माहिती देण्याची मागणी सौरव दास यांनी केली होती. परंतु इलेक्ट्रॉनिक व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय आणि ‘नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर’ यांनी याबाबत हात वर करत आपणास त्याची माहिती नाही असे उत्तर दिले.

काँग्रेस खा. राहुल गांधी यांनी सहा महिन्यापूर्वीच या ऍपबदद्ल गंभीर आरोप करत, ‘आरोग्य सेतू’ ही सर्वसामान्यांवर पाळत ठेवण्यासाठी एका खासगी ऑपरेटरच्या मदतीने तयार करण्यात आलेली अत्याधुनिक प्रणाली असल्याचे म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *