Ads

---

महाराष्ट्रात मोफत कोरोना लस !

By Xtralarge News

October 24, 2020 9:07 pm

Ads

मुंबई, दि. २४ ऑक्टोबर:
बिहारी जनतेला मोफत कोरोनाची लस देण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिली त्यावर टीका होत आहे. भाजपाने मतासाठी कोरोना लसीचे राजकारण केले असले तरी आम्ही महाराष्ट्रात मोफत कोरोनाची लस देऊ, अशी घोषणा अल्पसंख्यांक आणि कामगार मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
मलिक म्हणाले, बिहारमध्ये भाजपा हरली तरीही देशभरात मोफतच लसीकरण केले जाणार आहे. केंद्रातील भाजपा सरकारने मोफत लसीकरण केले अथवा केले नाही तरी आम्ही महाराष्ट्रात प्रत्येकाला मोफत कोरोनाची लस देऊ. भाजपाने बिहारमध्ये आम्ही जिंकलो तर कोरोनाची लस मोफत देऊ असे म्हटले आहे. भाजपाची ही भूमिका संपूर्ण देशातील लोकांवर अन्याय करणारी आहे, असे आम्हाला वाटते. देशातील सर्व जनतेला लस देण्याची जबाबदारी सरकारची आहे.”

देशात कोरोनाचे जे काही संकट निर्माण झाले त्याची संपूर्ण जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे. १ जानेवारी रोजी हेल्थ इमर्जन्सीची घोषणा करुन देशाच्या सीमा सील केल्या असत्या तर देशात लॉकडाउन करण्याची गरज पडली नसती. मात्र, ट्रम्प यांच्या प्रेमाखातर नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाच्या भानगडीमुळे संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला, करोडो लोक बेरोजगार झाले, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, असा आरोपही मलिक यांनी केला.

No comments to show.

Leave a Comment