सहकारी संस्थांची रणधुमाळी पुन्हा लांबणीवर.
सहकारी संस्थांची रणधुमाळी पुन्हा लांबणीवर.
सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलल्या !: बाळासाहेब पाटील.
मुंबई, दि. १७ जून २०२०२
राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
पाटील म्हणाले की, कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणूका १८ मार्च २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु सध्याच्या कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता ३१ मे, २०२० रोजीच्या आदेशान्वये राज्याचा लॅाकडाऊन कालावधी हा ३० जून २०२० पर्यत वाढविण्यात आला आहे तसेच अद्यापही साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशावेळी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे उचित होणार नाही. म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कक मधील तरतुदीनुसार राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्यावर असतील त्या टप्यावर पुन्हा पुढील तीन महिन्यांपर्यत पुढे ढकलण्यात येत आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.
