Ads

--

गद्दारी खूप महागात पडेल.

By Xtralarge News

June 18, 2026 3:12 pm

Ads

गद्दारी खूप महागात पडेल.

नवी दिल्ली, दि. १८ जून २६.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडलेले सहा खासदार त्यांच्या भूमिकेवर कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. उबाठाने आज बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला ते आले नाहीत. त्यामुळे शिवसेनेतील फूट अधोरिखित झाली आहे.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहा बंडखोर खासदारांची मनधरणी करण्याचा अंतिम प्रयत्नही अयशस्वी ठरला आहे. खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी संसदीय मंडळाची तातडीची बैठक बोलावली होती आणि त्यासाठी सर्व नऊ खासदारांची उपस्थिती अनिवार्य करणारा ‘व्हीप’ जारी करण्यात आला होता. मात्र, या बैठकीला केवळ तीनच खासदार या उपस्थित राहिले. तेच तीन खासदार जे सुरुवातीपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. सहा बंडखोर खासदारांपैकी कोणीही या बैठकीला हजर राहिले नाही.

पक्षाचा ‘व्हीप’ धुडकावून लावणाऱ्या बंडखोर खासदारांवर संजय राऊत यांनी कडक शब्दांत टीका केली, ही कृती म्हणजे ‘व्हीप’चे उल्लंघन आहे. याप्रकरणी संबंधित खासदारांकडून खुलासा मागवला जाईल जर त्यांनी खरोखरच लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली असेल, तर त्यांनी त्याचे फोटो सादर करावेत. यावेळी केलेली ही गद्दारी एकनाथ शिंदे आणि त्या सहाही खासदारांना खूप महागात पडेल. असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

No comments to show.

Leave a Comment